Home स्टोरी श्री सरस्वती साईश्वरी संस्थे तर्फे फराळ वाटप कार्यक्रम संपन्न!

श्री सरस्वती साईश्वरी संस्थे तर्फे फराळ वाटप कार्यक्रम संपन्न!

145

मसुरे प्रतिनिधी: 

 

श्री सरस्वती साईश्वरी संस्था मुंबई तर्फे नाशिक येथील इगतपुरी भागात गरजूंस दीपावली निमित्त नवीन कपडे , भांडी , साबण ,खेळणी व फराळ असा भरगच्च कार्यक्रम करून गरजूंन सोबत खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी करण्यात आली. सदर कार्यक्रमास प्रवरा मनचेकर व प्रणव प्रमोद मनचेकर यांचे विशेष सहकार्य लाभले.

तसेच दीपेश झांजम, लोकेश जैन, नूतन रावराणे,  दत्तात्रेय पडवळ, सुजाता टिकम, नरेश करलकर, संस्था अध्यक्ष सुरज बांदकर याच्या उपस्थितीत उपक्रम पार पडला.