Home स्टोरी श्री प्रेमानंद उर्फ बबनराव साळगावकर वाढदिवस विशेष

श्री प्रेमानंद उर्फ बबनराव साळगावकर वाढदिवस विशेष

154

सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी राजकारणाच्या इतिहासातील एक गजबजलेल नाव प्रेमानंद उर्फ बबनराव साळगावकर स्वच्छ चारित्र्य आणि लोकप्रिय स्वाभिमानी व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते आणि अशा या व्यक्तिमत्त्वाचा आज १६ फेब्रुवारी २०२३ जन्मदिवस. सामाजिक बांधिलकी सावंतवाडी व राजा छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्र मंडळ सावंतवाडी कडून साळगावकर साहेबांना जन्मदिवसाच्या भरघोस शुभेच्छा. उपरलकर – पाटेकर त्यांना दीर्घ आयुष्य देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. नगराध्यक्ष म्हणून जनतेमध्ये वावरत असताना ९० टक्के समाजकारण व १० टक्के राजकारण अशी ही एक त्यांची ओळख आहे. गोरगरिब ,श्रीमंत, मोठे उद्योजक तसेच नेते- मंत्री विविध स्तरावरील माणसं त्यांच्या नावाप्रमाणे व प्रेमळ स्वभावाने त्यांच्याशी जोडली गेलेली आहे. गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देऊन मदत करणे, तर वेळप्रसंगी एखाद्याच्या खंबीर पणे मागे उभे राहणे ही एक त्यांची खासियत आहे. साहित्य, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रामध्ये त्यांना खुप आवड आहेच पण निसर्गाशी त्यांच अतूट नातं जोडलेलं आहे नीटनेटकेपणा – स्वच्छता व झाडां- फुलांवर, पशुपक्ष्यांवर प्रेम करणं यात ते आपला आनंद समजतात. साईबाबा व श्री स्वामी समर्थ यांचे ते परमभक्त आहेत. तर कुणकेरी येथील पाळणेकोड धरणावरील गणपती त्यांची ओढ आहे. अशा या सर्व सामान्यांच्या सर्वसामान्य व्यक्तिमत्वाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देवाने त्यांच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करू दे….

शुभेच्छुक सामाजिक कार्यकर्ते आणि सामाजिक बांधिलकीचे पदाधिकारी

श्री रवी जाधव

भटवाडी, सावंतवाडी