सावंतवाडी प्रतिनिधी: शिवस्वराज्य मित्रमंडळ कलंबिस्त (मळा) बाजारपेठ आयोजीत दि.१९ फेब्रुवारी २०२४ रोजी शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवाचे औचीत्य साधुन कोल्हापुर येथील ” अमरक्रांती कला पथक “यांचा ” पोवाडा ” सादर करण्यात येणार आहे. १९ फेब्रुवारी २०२४ रोजी होणारा शिवजयंती उत्सव हा शिवमय व्हावा या उद्देशाने स. ९:०० वा •महाराजांच्या मुर्तिचे पुजन, स. ९: ३० वा•दर्शन व तिर्थप्रसाद,स. १०: ०० वा: “अमरक्रांती कलापथक “कोल्हापुर यांचे (पोवाडा ) सादरी करण,दु. १२: ३० वा. महाराजांची आरती, दु. १: ०० वा•महाप्रसाद, दु. ३:०० वा. ह.भ.प. श्री. संदेश गोसावी यांची किर्तन सेवा “पावन खिंडीचा रणसंग्राम ” सांय. ५ :०० वा. भजन सेवा शिवस्वराज्य मित्रमंडळ ,सांय. ६ : ०० वा. उत्तर पुजा व समारोप इ. कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तरी भावीकांनी व शिवभक्तांनी तिर्थ प्रसादाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन शिवस्वराज्य मित्रमंडळ कलंबिस्त (मळा) बाजारपेठ यांनी केले आहे.