Home स्टोरी शिवसेनेचे मा. नगरसेवक निलेश शिंदे आयोजित कल्याण पूर्वेत मोफत अक्युप्रेशर थेरेपी शिबीर!

शिवसेनेचे मा. नगरसेवक निलेश शिंदे आयोजित कल्याण पूर्वेत मोफत अक्युप्रेशर थेरेपी शिबीर!

142

कल्याण प्रतिनिधी:(आनंद गायकवाड) :– शिवसेनेचे माजी नगरसेवक निलेश शिंदे यांच्या आयोजनाने आणि रोटरी क्लब ऑफ कल्याण टायगर्स यांच्या सहकार्याने शिवाजी कॉलनी कल्याण पूर्वेत मोफत अक्युप्रेशर थेरेपी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे . ३ एप्रिल ते ९ एप्रिल २०१३ या दरम्यान सकाळी १० ते दुपारी ३ या वेळे दरम्यान सर्व वयोगटातील नागरीकांना या शिबीराचा लाभ घेता येणार आहे.

मधुमेहापासून ते मज्जा तंतु स्नायु समस्यांपर्यंतच्या विविध प्रकारच्या व्याधिवर या शिबीरात आधुनिक संगणकीय यंत्राव्दारे पाय तसेच हाताला अक्युप्रेशर थेरेपीद्वारे उपचार देण्यात येत असून या शिबीरास परिसरातील नागरीकांचा उत्फुर्त असा प्रतिसाद लाभत आहे. रोटरी क्लब ऑफ कल्याण टायगर्स यांच्या सहकार्याने आणि माजी नगरसेवक निलेश शिंदे यांच्या आयोजनाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबीराचा लाभ जास्तीत नागरीकांनी घेण्याचे आवाहन निलेश शिंदे तसेच विजय भोसले यांनी केले आहे.