सावंतवाडी प्रतिनिधी: मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. पण गावागावातील मराठी शाळा आता विध्यार्थ्यांच्या पटसंख्या अभावी ओस पडत चालले आहेत. पण या बालपणी शाळा मध्ये पुन्हा तीच लगबग तीच कुजबुज पाहायला मिळावी . यासाठी कलंबिस्त गणशेळवाडी येथील शिवसाम्राज्य प्रतिष्ठान आता पुढे सरसावली असून या प्रतिष्ठानने अंगणवाडी व प्राथमिक मराठी शाळेतील मुलांना दत्तक घेण्याचा संकल्प केला आहे. यंदा कलंबिस्त प्राथमिक शाळा. नंबर एक व गणशेळवाडी अंगणवाडीतील मुलांना चित्रकलेचे ज्ञान अवगत व्हावे व मराठी भाषा बोलता चालता यावी यासाठी मराठी अंकल पट्टी मराठी भाषा अक्षर ओळख आणि एज्युकेशन किट चे सुमारे ५० मुलांना भेट म्हणून देण्यात आले आहेत. सह्याद्री पट्ट्यातील कलंबिस्त हा माजी सैनिकांचा गाव या . गावातील तरुणांनी एकत्र येत आपल्या गावच्या अंगणवाड्या आणि प्राथमिक शाळा मध्ये पुन्हा मुले खेळावी, बागडावीत आणि पुन्हा शाळा पूर्वीप्रमाणे बहरव्यात यासाठी शिव साम्राज्य प्रतिष्ठांच्या झेंड्याखाली हा उपक्रम सुरू केला आहे. यंदाचे हे त्यांचे पहिलेच वर्ष आहे. गेल्या तीन वर्षांपूर्वी कलंबिस्त गणशेळवाडी येथील तरुणांनी शिवसाम्राज्य प्रतिष्ठानची स्थापना केली आणि आपल्या गावातील शैक्षणिक आरोग्य सामाजिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या काम करायचे, असा संकल्प केला आणि या संकल्पनेनुसार यंदाच्या वर्षी मराठी भाषेला केंद्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा दिला. पण गावातील मराठी बालपणीच्या शाळा आणि अंगणवाडी विद्यार्थी पटसंख्या अभावी शाळा बंदच्या मार्गावर आहेत. त्यामुळे आपल्या गावच्या मराठी शाळा आणि मराठी भाषा तिचे संवर्धन जतन व्हावे. या हेतूने यंदाच्या नव्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच टर्ममध्ये या दोन्ही शाळांना भेटी देत तेथील विद्यार्थ्यांची संख्या आणि एकंदरीत परिस्थिती याचा सर्वे केला आणि यानुसार मंगळवारी २४ जूनला मराठी भाषा अक्षर ओळख व चित्रकलेचे ज्ञान अवगत व्हावे आणि मुलं मोबाईल पासून दूर जावी. यासाठी त्यांना त्यांच्या हातांना चित्रांचे धडे गिरवता यावेत यासाठी चित्र साहित्य हे पहिली ते चौथी व अंगणवाडी च्या मुलांना भेट देण्यात आल्या.
यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सिद्धेश सावंत, सचिव रोहन सावंत, खजिनदार सुभाष देसाई, उपाध्यक्ष राजेश सावंत, विराज सावंत, तेजस उर्फ दिपक देसाई, ग्रामपंचायत सदस्य शेखर मेस्त्री, दशरथ नेवगी, पराग सावंत, सुहास सावंत, गुरुप्रसाद सावंत, राहुल सावंत, अमित देसाई, अंकुश मेस्त्री, विश्वजीत उर्फ विकी सावंत यांनी एकत्र येत हा उपक्रम राबवला आहे.
केंद्रप्रमुख गुंडू सावंत, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक संजय शेडगे व शिक्षिका सौ. श्वेता सावंत, चैत्राली राऊळ, अंगणवाडी सेविका सौ. सुहासिनी पवार यांच्या उपस्थितीत एज्युकेशन किट चे वाटप करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री शेडगे यांनी शिव साम्राज्य प्रतिष्ठानने हा केलेला उपक्रम स्तुत्य आहे. जेणेकरून गावातील शाळा आणि विद्यार्थी पुन्हा मराठी शाळेकडे वळतील आणि हे काम माजी विद्यार्थ्यांनी केला आहे. यात सातत्य ठेवावे.
यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सिद्धेश सावंत यांनी आमचे हे शिवसाम्राज्य प्रतिष्ठान सामाजिक भावनेच्या माध्यमातून निर्माण झाले आहे. आमचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आचार आत्मसात करून आम्ही उपक्रम राबवत आहोत. शैक्षणिक सामाजिक अध्यात्मिक दृष्ट्या आम्ही काम करत आहोत. आम्ही यापूर्वी होळी सणात आमच्या भागातील आमचं दैवत श्री धावगिरीश्वर देवस्थान कडे स्वच्छता अभियान व देवाचा जयघोष करणारे फलक लावून आध्यात्मिक सेवा केली आहे. असे कार्य यापुढेही एकोप्याने करण्याचा आमचा मानस आहे. आमच्या उपक्रमाला आमच्या वाड्यातील जुन्या जाणत्या व्यक्तींचे पाठबळ आमच्या पाठीशी आहे. असे ते म्हणाले.यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते .