Home स्टोरी शिरोडा वेळागर येथे ऑलिव्ह रिडले कासवाच्या पिल्लांना जीवदान…!

शिरोडा वेळागर येथे ऑलिव्ह रिडले कासवाच्या पिल्लांना जीवदान…!

224

शिरोडा: शिरोडा वेळागर येथील माजी ग्रामपंचायत सदस्य गुणाजी (आजु) अमरे व कासव मित्र, सामाजिक कार्यकर्ते आबा चिपकर यांनी या अंड्यांना सुरक्षित ठिकाणी वाळुच्या खड्यात पुरुन त्यांचे संरक्षण केले. व गेले अनेक वर्षे हे कार्य करित आहे.

पंचेचाळीस दिवसांपुर्वी आजु अमरे व कासव मित्र श्री राजाराम उर्फ आबा चीपकर यांनी सुरक्षित केलेल्या १२० अंड्यांमधून १०८ पिल्ले सुरक्षित पाण्यात सोडण्यात आली. सोडत असताना आजु अमरे ,आबा चिपकर , गौरीज अमरे , मदन अमरे , पास्कोल फर्नांडिस , आनंद अमरे, दीपा अमरे, संतोष भगत, भुषण मांजरेकर,कोमल भगत, शोजल भगत, प्रज्वल भगत, छकुली भगत, स्वपनेश भगत, सलोनी भगत, साची भगत, व विदेशी पर्यटक उपस्थित होते. पर्यटकांनी मनपुर्वक आनंद लुटला.