Home शिक्षण वेंगुर्ला येथे जीवनविद्येची ओळख करुन देणारा कोर्स “स्वानंद योग – लेवल १” चे आयोजन.

वेंगुर्ला येथे जीवनविद्येची ओळख करुन देणारा कोर्स “स्वानंद योग – लेवल १” चे आयोजन.

82

वेंगुर्ला प्रतिनिधी: स्वानंद योग लेवल १, ज्याला “फाउंडेशन कोर्स” असेही म्हणतात. हे सद्गुरू वामनराव पै जीवनविद्या यांच्या जीवनविद्या मिशन च्या अभ्यासक्रमाचा एक भाग आहे. हा कोर्स जीवनविद्या तत्वांची ओळख करून देतो. तसेच आरोग्य आणि संपत्ती  यांच्यातील संबंध स्पष्ट करतो. या कोर्समध्ये, नैसर्गिक आणि पद्धतशीर पद्धतीने शरीराची रचना कशी आहे? याचे शिक्षण दिले जाते. याचा उद्देश जीवनविद्या तत्वांचा वापर करून आरोग्य आणि संपत्ती यांच्यातील संबंध समजून घेणे हा आहे. शरीर, मन आणि संपत्ती यांच्यातील संबंधांचा अभ्यास करणे आणि त्यांचे व्यवस्थापन कसे करावे? हे या कोर्स च्या माध्यमातून सहज शिकता येते.

असा हा मानव जीवनासाठी अगदी महत्त्वाचा असा कोर्स जीवनविद्या शाखा वेंगुर्ल्याच्या वतीने दिनांक ३ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ९:०० ते दुपारी १:०० या वेळेत साई डीलक्स हॉल, एस. टी. स्टॅंड जवळ, सुंदर भाटले, वेंगुर्ले येथे आयोजित करण्यात आला आहे. आजच्या धावपळीच्या युगात मानवाने स्वतःला योग्य दिशेने कसं घडवलं पाहिजे? याबाबत सद्गुरु श्री वामनराव पै यांनी अनेक ग्रंथातून मार्गदर्शन केलेलं आहे. तसेच जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून वेगवेगळ्या कोर्सेसचे आयोजन करून मानवाला योग्य पद्धतीने जीवन जगता यावं यासाठी योग्य ती तरतूद करण्यात आली आहे. जेणेकरून सर्वांना सुखी जीवन जगण्याचे रहस्य कळेल आणि साहजिकच मानव जीवनात माणूस सुखी जीवन जगू शकेल.

जीवनाकडे पहाण्याची दृष्टी कशी हवी? मन म्हणजे काय?  मनासारखं घडण्यासाठी मनाला सारखं करण्याची युक्ती कोणती? ऐश्वर्यसंपन्न जीवनाच्या आनंदासाठी किती आणि कोणतं धन लागतं? या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे या जीवनविद्या मिशनच्या स्वानंद योग लेवल १, ज्याला “फाउंडेशन कोर्समध्ये” मिळतील. तन, मन आणि धन यांचे जीवनातील स्थान स्वानंद योग लेवल १, ज्याला फाउंडेशन कोर्सद्वारे समजून घेता येईल. त्यामुळे उत्कृष्टपणे जीवन जगण्यासाठी परिपूर्ण अशा या स्वानंद योग लेवल १, फाउंडेशन कोर्स चा जास्त जास्त लोकांनी फायदा घ्यावा. असे आवाहन जीवनविद्या शाखा वेंगुर्ल्याच्या पदाधिकारी आणि आयोजकांनी केले आहे.

स्वानंद योग लेवल १, फाउंडेशन कोर्ससाठी वयोमर्यादा  १५ वर्ष व त्यापुढील सर्व अशी आहे 

कोर्स रेजिस्ट्रेशन लिंक 

https://jeevanvidya.org/course-registration/350

अधिक माहितीसाठी संपर्क -: मिलिंद गावडे – 9420258640, रविंद्र मोचेमाडकर – 9823109475