Home स्टोरी वेंगुर्ला तुळस वेशिवाडा येथे डंपर पलटी! वाहतूक ठप्प

वेंगुर्ला तुळस वेशिवाडा येथे डंपर पलटी! वाहतूक ठप्प

151

वेंगुर्ला: वेंगुर्ला तुळस वेशिवाडा येथे डंपर पलटी होऊन अपघात झाला आहे. हा अपघात कसा आणि कोणत्या कारणामुळे झाला याची माहिती अजून मिळालेली नाही. प्रथम अंदाजात ड्रायव्हरचा ताबा सुटल्यामुळेच हा अपघात झाल्याची अशी शंका आहे. अपघात झालेल्या मालवाहतूक डंपरचा क्रमांक MH 07- 5649 असा आहे.

या अपघातात जीवितहानी झालेली नाही. तसेच कोणालाही दुखापत झालेली नाही. पलटी झालेल्या डंपर बाजूला करण्यासाठी ग्रामस्थ प्रयत्न करत आहेत. अशी माहिती तुळस ग्रामपंचायत सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते नारायण कुंभार यांनी दिली आहे.