Home स्टोरी वेंगुर्ला तुळस गावात गेल्या सात दिवसांपासून bsnl नेटवर्क सेवा बंद! ग्राहक नाराज

वेंगुर्ला तुळस गावात गेल्या सात दिवसांपासून bsnl नेटवर्क सेवा बंद! ग्राहक नाराज

253

सिंधुदुर्ग प्रतिनिधी: वेंगुर्ला तालुक्यातील तुळस गावामध्ये गेल्या सात दिवसांपासून bsnl ला नेटवर्क नाही आहे. या गावात जास्तीत जास्त बीएसएनएलचे ग्राहक आहेत. सध्याच्या काळात अनेक कामं ही फोनवर अवलंबुन आहेत. उद्योग व्यवसायात सध्या मोबाईल फोन ही तर काळाची गरज आहे. असं असतांना bsnl च्या ग्राहकांना bsnl चे नेटवर्क नसल्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

वेळोवेळी bsnl च्या अधिकाऱ्यांशी संपर्क करून bsnl च्या नेटवर्क समस्यांबाबत सूचना देऊनही bsnl नेटवर्क समस्या कायम असल्यामुळे आता ग्राहकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. अशी माहिती तुळस ग्रामपंचायत सदस्य श्री नारायण कुंभार यांनी दिली आहे. तसेच येत्या दोन दिवसात bsnl नेटवर्कसेवा सुरळीत न झाल्यास bsnl च्या मुख्य कार्यालयासमोर मोबाईल पाण्याच्या बादलीत ठेऊन जोपर्यंत bsnl नेटवर्क सुरु होत नाही तोपर्यंत शांततेत बसून राहणार असल्याची माहिती श्री नारायण कुंभार यांनी दिली आहे. आणि जर एवढं करून ही bsnl नेटवर्क तात्काळ सुरु नाही झालं तर तुळस गावातील bsnl ग्राहकांची जास्तच जास्त bsnl सिम कार्ड एकत्र करून त्याचा एक हार बनवून bsnl कार्यालयाच्या ऑफिस मध्ये ठेऊन bsnl सिम कार्ड दिवा, अगरबत्ती आणि फुले वाहून पूजा करून bsnl च्या अधिकाऱ्यांना देण्यात येतील. असे अगळेवेगळे आंदोलन कारण्याचा इशारा तुळस ग्रामपंचायत सदस्य श्री नारायण कुंभार यांनी दिला आहे