Home क्राईम विवाहित युवकाचे प्रेम प्रकरण! प्रियकराने केला प्रियसीचा खून.

विवाहित युवकाचे प्रेम प्रकरण! प्रियकराने केला प्रियसीचा खून.

316

लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणा-या एका मेकअप आर्टीस्ट प्रेयसीचा खून कारण्यात आले आणि तिचे प्रेत सुटकेसमध्ये कोंबून वापी या शहरात फेकण्यात आल्याची घटना उघड आली आहे. फिल्म इंडस्ट्रीत मेकअप आर्टिस्ट म्हणून काम कराणा-या नैनाचे तिच्यासोबतच काम करत असणाऱ्या कॉस्ट्युम डिझायनर मनोहर शुक्लासोबत प्रेमसंबंध होते. दोघेही नायगांव परिसरात एकत्र रहात होते.परंतु मनोहर विवाहित असल्यामुळे नैनावरून मनोहर आणि त्याच्या पत्नीमध्ये वारंवार भांडणे चालू असायची. तर दुसरीकडे नैना लग्नाचा तगादा लावत होती. त्यामुळे आपला संसार टिकवण्यासाठी मनोहरने आपल्या प्रेमाचा बळी दिला.

 

त्याने नैनाची हत्या केल्या वर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी सुटकेसमध्ये मृतदेह कोंबला आणि वापी शहराचा परिसरात फेकला. तिथे नैना चे प्रेत मिळाल्यानंतर ही घटना उघड झाली. नैना आणि त्याचा प्रियकर मनोहर या दोघांमध्ये पाच वर्षांपासून प्रेम संबंध होते. मनोहरने आपल्यासोबत लग्न करावे अशी तिची इच्छा होती. पण त्याचे आधीच लग्न झाले होते. त्यामुळे मनोहर यासाठी तयार नव्हता. पण तिने लग्न करण्यासाठी तगादा लावल्यामुळे हत्या केल्याचा आरोप मयत नैनाच्या बहिणीने केला आहे. पोलिसांनी आरोपी मनोहर याला अटक केली आहे. आणि त्याच्या विरोधात गुन्हा दाखल कारण्यात आला आहे. पोलीस या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत.