Home Uncategorized विलवडेत शक्तिशाली भुसुरुंग स्फोट, परिसरातील घरांना तडे..

विलवडेत शक्तिशाली भुसुरुंग स्फोट, परिसरातील घरांना तडे..

80

ग्रामस्थ आक्रमक; योग्य ती कारवाई करा, तहसीलदारांकडे मागणी….

बांदा : विलवडे येथे सुरू असलेल्या दगड खाणीवर शक्तिशाली सुरुंग स्फोट केले जात असल्यामुळे परिसरातील घरांना भेगा पडल्या आहेत. वाफोली हद्दीत दगडापासून वाळू बनविण्यात येत असल्यामुळे परिसरात प्रदूषण होत आहे. त्यामुळे याकडे प्रशासनाने लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी संबंधित ग्रामस्थांनी आज तहसीलदारांकडे केली. याबाबत माजी मनसे तालुकाध्यक्ष गुरुदास गंवडे व माजी विलवडे शाखा प्रमुख संतोष सावंत यांच्या नेतृत्वाखाली आज सावंतवाडी तहसिलदार अरुण उंडे यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात असे नमूद करण्यात आले आहे की, विलवडे व वाफोली हद्दीत काळ्या दगडापासून खडी व वाळू बनविण्याचे प्रकल्पासून १०० मीटरवर गावची वस्ती आहे. रात्र दिवस या प्रकल्पासून सतत कर्कश आवाज यातून उडणारी धुळ व काळा दगड उत्खननासाठी शक्तीशाली स्फोटासाठी वापरलेले रासायनिक पदार्थाची दुर्गंधीमुळे गावातील नागरीकांना श्वसनाचे व इतर आजार होत आहे. यासाठी दगड खाणी व त्यावर प्रक्रीया करणारे (क्रेशर) इत्यादी प्रकल्प त्वरीत बंद करण्यासाठी आपली भुमिका व व्यथा मांडली. यावेळी तहसीलदार श्री. उंडे यांनी सांगितले की, सदर काळ्या दगडाच्या खाणी किंवा क्रशरला परवानगी ही जिल्हा खनिकर्म विभाग आणि यांनी परवानगी दिलेले आहे. त्यामुळे सदर क्रशरमुळे होणार त्रास आहे त्या संदर्भात तुम्ही जिल्हा खनिकर्म विभाग आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करा, माझ्या कारवाई करता येईल ती करतो, असे आश्वासन दिले. यावेळी नायब तहसिलदार मनोज मुसळे यांच्यासह विलवडे नुकसान ग्रस्त पिडीत सुजिता सावंत, संदिप सावंत, संदेश सावंत, रश्मी सावंत, संपदा सावंत, दिपीका सावंत, समिता सावंत, समिर सावंत, नीता सावंत, अजित दळवी, किर्ती सळवी, महेंद्र सावंत इत्यादी उपस्थित होते.