Home Uncategorized विरार पूर्व येथे मसाले उद्योग प्रशिक्षण केंद्र सुरू….

विरार पूर्व येथे मसाले उद्योग प्रशिक्षण केंद्र सुरू….

678

दोडामार्ग वार्ताहर : आत्माराम परब महाराष्ट्र उद्योजकता विकास कें द्र ह्या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या माध्यमातून मसाला उद्योग प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन विरार पूर्व सबवे समोरील मधुमंगल अपार्टमेंट, एचडीएफसी बँकेच्या वरती, पहिला मजला, अविण्य फाउंडेशन ट्रस्ट, आर जे हेल्थकेअर सेंटर या संस्थेच्या माध्यमातून २३ फेब्रुवारी गुरुवारी संपन्न झाला. मसाले उद्योग व्यवसायात फार मोठी संधी आहे. आणि यातून निश्चितच उद्योग व्यवसायाची वाढ निर्माण होऊन, अनेकांना रोजगाराची संधी निर्माण होणार आहे. असे वक्तव्य कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर सुशील सावंत अक्युप्रेशर तज्ञ यांनी आपल्या भाषणात केले., तर मसाले हे पाककलेतील एक प्रमुख पदार्थ असून यातूनच जेवणाची चव ही लज्जतदार होत असते. आणि महिला वर्गांसाठी हा विषय अत्यंत संवेदनशील असतो कारण ते चवी चवीने मसालेदार जेवण आपल्या मायेतून, प्रेमाने बनवत असतात. आणि ते आपण आपल्या कुटुंबाला खाऊ घालत असतात. असं डॉक्टर अंजली सावंत यांनी भाषणातून आपलं मत व्यक्त केलं. त्याचप्रमाणे मुंबई मनपाचे निवृत्त शिक्षक बापू परब यांनी मसाले उद्योग व्यवसाय तसेच आर्थिक भांडवलासाठी बँकांच्या माध्यमातून कसं जायचं आणि कोणत्या कागदपत्रांची पूर्तता अपेक्षित आहे याबाबतची माहिती या ठिकाणी दिली. एम.सी.ई.डी. महाराष्ट्र उद्योजक व्यवसाय प्रशिक्षण केंद्र चे अधिकारी श्री धम्मपाल थोरात सर यांनी एमसीईडीचे अशा पद्धतीने व्यावसायिक प्रशिक्षण देऊन उद्योजक व्यवसाय घडवावे याबाबतची माहिती या ठिकाणी दिली. तर मसाले उद्योग प्रशिक्षक माधवी देसाई मॅडम यांनी मसाले प्रक्रिया व आणि उत्पादनाबाबत ची माहिती, तर डॉक्टर सुनील वाघमारे सर(एक्यूप्रेशर तज्ञ) यांनी आता नोकरीच्या मागे न लागता उद्योग व्यवसायामध्ये आपण आपले यश संपादन केले पाहिजे. आणि एक उद्योजक म्हणून आपण नावारूपाला आले पाहिजे. असं उपस्थित श्रोत्यांमध्ये आपलं भाषण व्यक्त केलं,तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रस्तावना एम.सी. इ.डी. विक्रांत वाकचौरे यांनी केली आणि हे प्रशिक्षण शिबिर दिनांक २३फेब्रुवारी ते २ मार्च पर्यंत होणार आहे. या ठिकाणी अनेक प्रशिक्षणार्थी महिला व पुरुष मंडळी या कार्यक्रमास उपस्थित राहून आपण उद्योजक होणारच याची ग्वाही आपली स्वतःची ओळख करून देताना सांगितले. अधिक माहितीसाठी संपर्क 8369362933 साधावा.