Home स्टोरी विज ग्राहकांना अवाजवी पाठविलेल्या विज देयकांचे पुनरमुल्यांकन करून रितसर बिले द्या! माजी...

विज ग्राहकांना अवाजवी पाठविलेल्या विज देयकांचे पुनरमुल्यांकन करून रितसर बिले द्या! माजी महापौर रमेश जाधव

115

कल्याण प्रतिनिधी: (आनंद गायकवाड): – गेल्या तिन महिन्यात महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीने विज ग्राहकांना वाजवी पेक्षा अव्वाच्या सव्वा विज देयके पाठवून विज ग्राहकांच्या खिशाचा आर्धीक भूर्दंड वाढवला आहे. सदरची बिले हि चुकीची निघत असून ज्या ग्राहकांची विज देयके अव्वाच्या सव्वा निघाली आहेत त्यांच्या विज देयकांचे पुनरमुल्पांकन करून सुधारीत देयके देण्यात यावीत अशी मागणी एका लेखी निवेदनाद्वारे विज वितरण कंपनीकडे माजी महापौर रमेश जाधव यांनी मागणी केली आहे. माहे मार्च २०२३ ते जुन २०२३ या तिन महिन्यात एका कुटूंबात केवळ २ ते ३ व्यक्ती असाऱ्याकुंबाचे विज देयकही नियमितच्या विज देयका पेक्षा दुपटीने जास्त आली आहेत. मध्यम वर्गीय कुटूंबाच्या तक्रारीची संबंधीत अधिकारी दखल घेत नाहीत, आधी बिल भरा नंतर तक्रारीचे बघु, मिटर तपासणी साठी सुद्धा एक हजार रुपये आधी भरण्याची सक्ती केली जात आहे. आदी बाबींचा या निवेदनात निषेध व्यक्त करण्यात आला असून तक्रारदार ग्राहकांची देयके दुरुस्त करून देण्यात आली नाहीत तर २० जुलै २०२३ रोजी विज वितरण कंपनीच्या कार्यालयावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तिव्र निदर्शने करण्यात येतील, असा इशारा सदर निवेदनात देण्यात आला आहे. सदरचे निवेदन कल्याण पश्चिमेतील तेजश्री कार्यालयातील विज वितरण कंपनी कल्याण परिमंडळाचे अधिक्षक श्री पाटील यांचे कडे देण्यात आले आहे. या समयी शाखाप्रमुख प्रमोद परब, मॅथ्यु आदी कार्यकर्ते उपस्थित होते .