Home स्टोरी विकासाचे व्हिजन असलेले आमदार वैभव नाईक साहेब नमस्कार…!

विकासाचे व्हिजन असलेले आमदार वैभव नाईक साहेब नमस्कार…!

230

सिंधुदुर्ग: आज माझ्या भागातील मोरेश्वर रांज नाल्याच्या बांधकामाचे भूमीपूजन करण्यात आले. गेली अनेक वर्षे माझ्या भागातील मोरेश्वर वाडी, झालझुल वाडी, दूधवडकर वाडी, गर्दे रोड ह्या भागातील नागरिकांना समुद्री पाण्यामुळे अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे.मोरेश्वर रांज नाल्यातील खाऱ्या पाण्यामुळे अनेकांच्या पिण्याच्या पाण्याच्या विहिरी शारयुक्त ( खाऱ्या ) झाल्या आहेत. शेकडो हेक्टर जमीन नापिक झाल्या आहेत. त्याचप्रमाणे पावसाळा झाल्यानंतर या ठिकाणी अनेक भागात पाणी साचून मोठ्या प्रमाणात डास उत्पत्ती होऊन नागरिकांना आरोग्याच्या समस्याना तोंड द्यावे लागते. या सर्व समस्या लक्षात घेऊन स्थानिक नगरसेविका तृप्ती मयेकर, नगरसेविका सेजल परब, शिवसेना मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी बांधकाम सभापती मंदार केणी यांनी याबाबत मा. आमदार वैभव नाईक साहेब यांच्याकडे या नाल्याचा बांधकामाबद्दल मागणी केली मा. आमदार वैभव नाईक साहेबांनी तातडीने या कामासाठी सुमारे १ कोटी ५६ लाख रु चा निधी उपलब्ध करून दिला आहे. या नाल्याचे बांधकाम झाल्यावर पुढील काही वर्षातच आजूबाजूच्या विहिरी पिण्याच्या पाण्या योग्य होतील. त्याच प्रमाणे ज्या ज्या जमिनी नापिक झाल्या आहेत त्या सुपीक होण्यास नक्कीच मदत होईल. आमची मागणी पूर्ण केल्याबद्दल माझ्या प्रभागातील नागरिकांच्या वतीने मी आ. वैभव नाईक यांचे जाहीर आभार व्यक्त करतो.