Home स्टोरी वंदना घाणेकर व विजय चौकेकर याना पुरस्कार प्रदान!

वंदना घाणेकर व विजय चौकेकर याना पुरस्कार प्रदान!

62

मसूरे प्रतिनिधी: बॅ. नाथ पै.सेवांगणच्या वतीने शिवजयंती उत्सवाचे औचित्य साधून निरामय केंद्र कोलगावच्या सचिव वंदना घाणेकर याना बापूभाई शिरोडकर स्मृति आदर्श समाजसेविका पुरस्कार व विजय चौकेकर याना संजय नाईक स्मृति आदर्श शिक्षक कार्यकर्ता पुरस्कार वितरीत करण्यात आला.

प्रारंभी दीपक भोगटे यांनी बापूभाई शिरोडका पुरस्काराचे २३ वे वर्ष असून संजय नाईक पुरस्कार या वर्षो पासून देण्यात येत असल्याचे सांगितले. सेवांगणचे हे रौप्य महोत्सवी वर्ष असून या वर्षात विविध उपक्रम राबवणार असल्याचे सांगितले.

वंदना घाणेकर यानी १०वी त असताना बाबा आमटे यांच्यावरील आनंदवन हा धडा वाचल्यावर समाजसेवेची आवड निर्माण झाली. कट्टा येथे राहात असताना बापूभाईच्या देखण्या आणि सेवाभावी व्यक्तिमत्वाने आपण भारावून गेले होते. निरामय केंद्राद्वारे विद्यार्थ्याना मदत करता आली याचे समाधान आहे. हा पुरस्कार मला खूप आनंददायी वाटतो. व यापुढे ही माझे काम मी करतच राहीन असे त्या म्हणाल्या.

विजय चौकेकर यानी आपल्या बालपणा पासून शिक्षक म्हणून सेवानिवृत होईपर्यंतचा प्रवास विशद केला. व यापुढे अंधश्रद्धा निमूलनाच कामासाठी सर्वस्वाने वाहून घेणार असल्याचे प्रतिपादन केले. महेश नाईक यानी संजय नाईक यांच्या जीवनातील मला माहित नसलेले पैलू आज मला समजले. संजय नाईक यांच्या व्यक्तिमत्वाला साजेशे स्मारक उभारण्यात येणार असून सेवांगणने पुरस्कार देऊन नाईक सरांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. नर्सरी सेवांगणात धन्यवाद दिलेसुरेश ठाकूर यानी विजय चौकेकर यांची पुरस्कारासाठी केलेली निवड अतिशय योग्य असून कथामालेचा कार्यकर्ता सन्मानित होतो याचे फार समाधान वाटते असे सांगितले.

उन्मेष सावंत यानी दुसऱ्याला काहीतरी देण्यामध्ये जो आनंद आहे तो कशानेही मिळणार नाही. सीबी नाईक सरांमुळे मला ही समाजसेवेची आवड निर्माण झाली. सेवांगणास माझे नेहमीच सहकार्य राहिल असे प्रतिपादन त्यांनी केले. उदय पंडित यानी गौतम बुद्धांचा एक किस्सा कथन करून दोन पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा समाजसेवेचा गौरव केला ॲड देवदत परुळेकर यानी आजचे पुरस्कार विजेते व शिवाजीचे कार्ययाची सांगड घातली. शिवरायानी कधीही मुहुर्त काढला नाही. महिलाच्या मानसन्मानासाठी स्वतःच्या सरदाराना शिक्षा केली. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले. त्यांच्या या गुणांचा सर्वानी अंगिकार केला तर खऱ्या अर्थाने शिवजयंती साजरी झाली असे म्हणावे लागेल. शिवप्रतिमेसमोर दीप प्रज्वलन करण्यात आले. वंदना घाणेकर यांना उन्मेष सावंत यांचे हस्ते व विजय चौकेकर याना महेश नाईक यांचे हस्ते स्मृतिचिन्ह सन्मानपत्र शाल श्रीफळ देऊन सन्मानीत करण्यात आले. कट्टा परिसरातील ५ गरीब मुलीना उन्येष सावंत यांच्या माध्यमातून ग्रँट इन्स्ट्रमेंट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या CRS फंडातून सायकलचे वितरण करण्यात आले.

वराडकर हायस्कूलेच्या साने गुरुजी प्रश्नमंच स्पर्धेतील अव्वल क्रमाकांच्या मुलीना सन्मानीत करण्यात आले. वैष्णवी लाड यानी सूत्रसंचलन केले. व बाळ नांदोसकर यानी आभार मानले.

या कार्यक्रमास रश्मी पाटील, प्रसाद घाणेकर,विकास म्हाडगुत, बापू तळावडेकर, गीता नाईक, सौ नाईक, वीणा म्हाडगुत, भाट सर, संध्या म्हाडगुत, ॲड राजीव बिले, चांदरकर सर,पेंडूरकर सर, अर्जून पेंडूरकर,भारत पेंडूरकर, परब, आवळेगावकर काळसेकर सर, विद्या चिंदरकर, जांभवडेकर मॅडम, मंदार सांबारी,सकपाळ सर, कृष्णा पाताडे, आकेरकर सर, सदानंद कांबळी, गुरुनाथ ताम्हणकर,अनिल माळवदे, तेजल ताम्हणकर, कथामालेचे कार्यकर्ते शिक्षक पालक व विद्यार्थी उपस्थित होते.