Home स्टोरी रेशनवर वितरित होणाऱ्या तांदळासंदर्भात मनसेची तहसील कार्यालयात धडक….!

रेशनवर वितरित होणाऱ्या तांदळासंदर्भात मनसेची तहसील कार्यालयात धडक….!

139

तांदूळ प्लास्टिक सदृश्य असल्याची तक्रार

सावंतवाडी:

सावंतवाडी तालुक्यातील गावात रेशन दुकानात मोफत व अल्प दरात धान्य पुरवठा केला जातो. या धान्यात जे तांदूळ वितरित केले जातात त्या तांदळात काही तांदूळ हे प्लास्टिक सदृश दिसून आले. हे तांदूळ शिजवल्यानंतर चिवट लागतात अशी तक्रार सावंतवाडी तालुक्यातील आरोस तिरोडा नाणोस शेर्ले माडखोल इन्सुलि न्हावेली आदी भागातून बऱ्याच लोकांनी मनसे कडे केली होती. या पार्श्वभूमीवर मनसे पदाधिकाऱ्यांनी तहसील कार्यालयात धडक देत तक्रार केली.

यावेळी पुरवठा अधिकारी यांनी हा तांदूळ प्लास्टिकचा नसून ४५ प्रोटीन युक्त तांदूळ असल्याचे सांगितले. हे तांदूळ खाण्यायोग्य असल्याचे पुरवठा अधिकारी यांनी स्पष्ट केले.

पण या तांदळाच्या बाबतीत ग्रामीण भागात लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला असून हे तांदूळ जर खाण्यायोग्य आहेत तर तहसील कार्यालयामार्फत याची जनजागृती होणे आवश्यक आहे. तसेच सदर तांदळाचे नमुने तपासणीसाठी मनसे मार्फत प्रयोगशाळेत पाठवण्यात येतील तसेच तहसील कार्यालयामार्फत सुद्धा हे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात यावेत अशी मागणी केली.

तर सावंतवाडीत ग्रामीण भागात संभ्रम दूर होण्यासाठी जनजागृती करा अशी मागणी उपस्थित महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार यांच्याकडे केली तशी जनजागृती करण्याची ग्वाही तहसीलदार श्रीधर पाटील यांनी दिली.

सचिव मनोज कांबळी,नंदू परब, प्रणित तळकर,दिलीप नाईक, गुरुनाथ नाईक व इतर मनसैनिक उपस्थित होते.