Home राजकारण राष्ट्रवादी कॉंग्रेस किती दिवसांची सोबती, सांगू शकत नाही! पृथ्वीराज चव्हाण यांचे संकेत

राष्ट्रवादी कॉंग्रेस किती दिवसांची सोबती, सांगू शकत नाही! पृथ्वीराज चव्हाण यांचे संकेत

77

सिंधुदुर्ग प्रतिनिधी: राष्ट्रवादी कॉंग्रेस आमच्यासोबत किती दिवस राहील, माहीत नाही, असे संकेत कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले. कर्नाटकातील निपाणी मतदारसंघात प्रचारात ते बोलत होते. या मतदारसंघात कॉंग्रेसच्या उमेदवाराच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसने उमेदवार दिला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने येथे आपला उमेदवार उभा केल्याचे मी ऐकले. ते अजून आमच्यासोबत आहेत. मात्र, किती दिवस थांबतील माहीत नाही; कारण त्यांची भाजपासोबत रोज बोलणी सुरू आहे. या आशयाचे वृत्त रोज वर्तमानपत्रात येत आहे. काय निर्णय घ्यायचा हे त्यांनी ठरवावे, पण राष्ट्रवादी कॉंग्रेसचा राष्ट्रीय पक्ष म्हणून दर्जा रद्द झाला आहे. त्यामुळे इतर राज्यांत जाऊन स्वत:ची टक्केवारी वाढली तर, पुन्हा आपल्याला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळेल, असे त्यांना वाटत असावे, असे चव्हाण म्हणाले. दरम्यान, पृथ्वीराज चव्हाण यांच्या दाव्यावर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मला त्याविषयी माहिती नाही. मला इतकेच माहीत आहे की, महाविकास आघाडीत आम्ही एकत्र आहोत. तुम्ही आमची एकी आणि वज्रमूठ पाहिली, असे संजय राऊत म्हणाले.

अजित पवार आमच्याकडे येणार: गुलाबराव पाटील*काही दिवसांत अजित दादा पवार हे आमच्याकडे येणार असल्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार भाजपात जाणार असल्याच्या चर्चा रंगत असताना, या केवळ चर्चा आहेत. यात कोणतेही तथ्य नाही, असे अजित पवार यांनी सांगून या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला होता.