Home राजकारण राष्ट्रवादी काँग्रेसच्या १७ नेत्यांचा शिंदे गटात प्रवेश….

राष्ट्रवादी काँग्रेसच्या १७ नेत्यांचा शिंदे गटात प्रवेश….

178

२६ मे वार्ता: राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोंदियातील दोन नगराध्यक्षांनी आणि पंधरा नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित ठाण्यातील निवासस्थानी हा पक्ष प्रवेश पार पडला आहे. हा पक्ष प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का देणार असल्याची चर्चा होत.

काल गुरुवार दि. २५ मे रोजी शिवसेना आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीत भाजप २६ आणि शिवसेना २२ असा फॉम्युला ठरला असल्याचे समजते. ही प्राथमिक चर्चा झाली आहे. यानंतर अजून बैठक होऊन जागा वाटपाबाबत अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित होते.