Home स्टोरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदराव पवार यांचे जिल्ह्यात जंगी स्वागत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदराव पवार यांचे जिल्ह्यात जंगी स्वागत.

109

सिंधुदुर्ग: आज दिनांक २४ रोजी गुरुवारी वेंगुर्ला येथे भारताचे माजी कृषी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदराव पवार हे आज आणी उद्या सिंधुदुर्गा जिल्ह्याच्या खासगी दौऱ्यावर हेलिकॉप्टने आले असता त्यांचे पुष्प गुच्छ देऊन राष्ट्रवादी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी उत्साहात भव्य स्वागत केले.त्यामध्ये जिल्हाध्यक्ष अमित सामंत माजी राज्यमंत्री प्रवीण भोंसले, विक्टर दांटस, प्रसाद रेगे, प्रदेश सेक्रेटरी नम्रता कुबल, महिला जिल्हा अध्यक्ष ऍड. रेवती राणे, सावली पाटकर,अजित नातू, मनोज वाघमोरे, विलास सावळ व इतर कार्यकर्ते सहभागी होते.

दुपारी 12 वा प्रदेश फळ सवशोधन केंद्र, वेंगुर्ला येथे कोकण कृषी विद्यापिठाचे व्हाईस चान्सलर मा साठे यांचे अध्यक्षते खाली विद्यापीठानें काजू आंबा नारळ सुपारी भात इत्यादी बाबत केलेली प्रगती बाबत पवार साहेबांनी माहिती घेतली व कोकण विद्यापीठाने शेतकऱ्यांना प्रगत करण्यास वेळोवेळी मार्गदर्शन करावे अशी सूचना केली. नंतर स्वर्गीय समजवाडी नेते खासदार ब्यारिस्टर नाथ पई यांच्या स्मृती भावनास भेट दिली व आदरांजली वाहिली. आपल्या भाषणात नाथ पई यांच्या लोकसभे मधील अनेक आठणींना उजाळा दिला.स्व नाथ पई यांची नात व ट्रस्टची अध्यक्ष अदिती पै, उमेश गालवणकर, व वालावलकर यांनी सर्वांचे आभार मानले. रात्री गोवाचे उद्योगपती श्री अवधूत टीमलो यांच्या आरवली टाक येथील हॉटेल आराकविला येथे कुटुंबंसह मुक्काम आहे. उद्या सकाळी 9 वा आंबोली येथील ऊस उत्पाद्दाम संशोधन केंद्रास भेट ब मार्गदर्शन करून बेळगांव कडे प्रयाण,