Home स्टोरी राज्यात ५ दिवस मुसळधार पावसाचा IMD ने दिला इशारा!

राज्यात ५ दिवस मुसळधार पावसाचा IMD ने दिला इशारा!

250

सिंधुदुर्ग प्रतिनिधी: राज्यात पावसाने धुमाकूळ घातला असून आता आणखीन पुढील ५ दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. या कालावधीत कोकण,मध्य महाराष्ट्र व पूर्व विदर्भाच्या काही भागात जोरदार-अतीजोरदार व मराठवाड्यात मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात आलेल्या मुसळधार पावसाने दोन दिवसात ८ ते १० हजार हेक्टर शेती खरडून गेलीय. आज पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने शेतकर्यांपुढे मोठ संकट उभ राहिले आहे.गेल्या दोन दिवसांपासून विदर्भात झालेल्या ढगफुटी आणि महापुरामुळे शेतीचं सर्वाधिक नुकसान झालंय. यवतमाळ, वाशिम, बुलडाणा अणि अकोल्या जिल्ह्यात हे सर्वाधिक नुकसान आहे.

पेरणी केलेली शेती खरडून गेल्याने पुन्हा पेरणी कशी करायची हा प्रश्न? शेतकऱ्यांना पडलाय. तर गुजरातमधील विविध जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे महापूर आला आहे. असे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत जे भयावह आहेत. पावसामुळे आलेल्या पुरात वाहने वाहून गेल्याचे दिसून येत आहे. लोकांनाही अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे दिसून आले आहे.

हवामान केंद्राने रविवारी जारी केलेल्या अद्यतनात म्हटले आहे की, गुजरात आणि मध्य महाराष्ट्र राज्यात २३ जुलै रोजी अत्यंत मुसळधार पावसाची (२०४.४ मिमी पेक्षा जास्त) शक्यता आहे. पावसामुळे स्थानिक पातळीवर पूर येऊ शकतो. अशा परिस्थितीत, पाणी साचण्याची शक्यता असलेल्या भागात जाणे टाळा, कमकुवत संरचनांपासून दूर रहा. अहमदाबादच्या हवामान केंद्राने देवभूमी द्वारका, राजकोट, वलसाड आणि भंगारसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. तर कच्छ, जामनगर, पोरबंदर, जुनागढ, अमरेली, गीर सोमनाथ, आनंद, वडोदरा, भरूच, सुरत आणि नवसारीसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे तर मेहसाबा, अरवली, अहमदाबाद, नर्मदा येथे यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या मते, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि गुजरात राज्यातील घाट भागात अत्यंत मुसळधार पावसाची क्रिया सुरू राहण्याची आणि त्यानंतर कमी होण्याची शक्यता आहे. २३ ते २७ जुलै दरम्यान देशाच्या मध्यवर्ती भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. त्याच वेळी, २५ जुलैपासून, वायव्य भारतात पावसाच्या हालचालींमध्ये वाढ होईल .