Home राजकारण राज्याच्या मंत्रीमंडळाचा विस्तार होणार!

राज्याच्या मंत्रीमंडळाचा विस्तार होणार!

208

१२ जुलै वार्ता: वर्षापूर्वी शिवसेनेमध्ये बंडखोरी करून एकनाथ शिंदे यांनी भाजप सोबत सरकार स्थापन करत मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले. त्यानंतर आता अजित पवार यांनी राष्ट्रवादीमध्ये बंडखोरी करत भाजपसोबत हात मिळवणी करत उपमुख्यमंत्री पदावर विराजमान झाले. त्यामुळे सध्या राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. त्यातच आता लवकरच मंत्रीमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे कोणाला कोणतं पद मंत्री पद मिळणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे. कोकणातून उदय सामंत, दीपक केसरकर यांच्यानंतर आदिती तटकरे यांना संधी देण्यात आली आहे. मात्र मंत्रिपदाची इच्छा यापूर्वीच व्यक्त केलेले शिवसेनेचे महाडचे जेष्ठ आमदार भरत गोगावले यांचा अद्याप मंत्रिमंडळात समावेश करण्यात आलेला नाही.यामुळे आता त्यांना संधी दिली जाणार आहे. येत्या एक दोन दिवसात हा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. यामध्ये मंत्रिमंडळाच्या विस्तारात भरत गोगावले यांचे नाव निश्चित झाले आहे.गोगावले यांना मंत्रिमंडळ स्थान मिळाल्यास कोकणात उदय सामंत, आदिती तटकरे व दीपक केसरकर अशी चार मंत्रीपदे वाट्याला येतील. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

डॉ. बालाजी किणीकर, संजय शिरसाट, भरत गोगावले यांचा समावेश होणार असल्याची चर्चा आहे. अजित पवार यांच्याकडे अर्थ खाते देण्यास शिवसेना व भाजप या दोघांचाही विरोध आहे. त्यामुळे त्यांच्याकडे महसूल खाते देण्यात येईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार, डॉ तानाजी सावंत आणि संदीपान भुमरे यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात येणार असल्याची चर्चा आहे.