Home स्टोरी राजकर्ते शासन आणि प्रशासनातील अधिकारी हे लोकशाहीची दोन चाके! आ. नितेश राणे

राजकर्ते शासन आणि प्रशासनातील अधिकारी हे लोकशाहीची दोन चाके! आ. नितेश राणे

135

पावसाळ्यात सर्वसामान्य जनतेला कोणताही त्रास होणार नाही याची खबरदारी घ्या| आ. नितेश राणेंच्या अधिकाऱ्यांना सूचना

कणकवली: येथील तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी कणकवली येथील कार्यालयात आपत्ती व्यवस्थापनची बैठक संपन्न झाली. यावेळी आमदार नितेश राणे देखील उपस्थित होते.यावेळी बोलताना आ. नितेश राणे म्हणाले, आम्ही राजकर्ते शासन आणि प्रशासनातील अधिकारी हे लोकशाहीची दोन चाके आहेत. आपण जनतेचे सेवक आहोत या भावनेने काम केलं तर किमान ९८% प्रश्न आणी समस्यां या मार्गी लागतील. तसेच जनता तुम्हाला आशीर्वाद देईल. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी वरिष्ठ पातळीवर मंत्रालयीन पातळीवर आवश्यकता भासल्यास या भागाचा जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मला फोन करा आपण उद्भवलेल्या समस्यां तातडीने मार्गी लावू. परंतु या पावसाळ्यात आपल्या मतदार संघातील जनतेला नैसर्गिक आपत्तीत त्रास होता नये याची दक्षता घ्या. अशा सूचना आमदार नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी कणकवली, देवगड, वैभववाडी तालुक्याच्या आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक प्रांताधिकारी जगदीश कातकर यांच्या अध्यक्षतेखाली कणकवली तहसीलदार कार्यलयात झाली. यावेळी आमदार नितेश राणे बोलत होते.सदरच्या बैठकीला कणकवली तहसीलदार रमेश पवार, वैभववाडी तहसीलदार देसाई, महावितरण कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, राष्ट्रीय महामार्ग अभियंता श्रीनिवासन, एसटी, आरोग्य विभागाचे अधिकारी, जिल्हा परिषद, बांधकाम, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी उपस्थित होते.

करूळ घाट रस्त्याच्या दुरवस्थेवरून अभियंता श्रीनिवासन याना आमदार नितेश राणे यांनी हायवेच्या कामावरून धारेवर धरले. तुम्हाला खडे बोल ऐकायची सवय पडलीय आणि आम्हाला बोलायचा कंटाळा आलाय, अशा खडतर शब्दांत आमदार राणेंनी आपली नाराजी बोलून दाखवली. कणकवली शहरातील उड्डाणपुलावरून सर्व्हिस रस्त्यावर कोसळणाऱ्या धबधब्यासारखे कोसळणाऱ्या पाण्याच्या प्रश्नावरून देखील ठेकेदार दिलीप बिल्डकाँनच्या अधिकाऱ्यांना चांगलीच समज दिली. एकंदरीत आयोजित केलेल्या आपत्ती व्यवस्थापन बैठकीत कणकवली विधानसभा मतदारसंघात जनतेला कोणताही त्रास पावसाळ्यात होऊ नये याबाबत दक्षता घेण्याची सूचना आमदार नितेश राणे यांनी केल्या.