वेंगुर्ले: वात्सल्य सामाजिक संस्था व निर्धार न्यूज लोकसेवा फाउंडेशन, महाराष्ट्र आयोजित मराठी राजभाषा दिन व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून छत्रपती शिवराय संमेलन, कुडाळ २०२३ या कार्यक्रमात वेंगुर्ला तालुक्यातील वेंगुर्ले एज्युकेशन सोसायटीच्या रा. कृ. पाटकर हायस्कुलच्या उपक्रमशिल शिक्षिका सौ. समृद्धी संजय पिळणकर – मुननकर यांना राष्ट्रीय लोकसेवा शैक्षणिक सेवारत्न सन्मान २०२३ हा पुरस्कार महाराष्ट्र राज्याचा पद्मश्री पुरस्कार प्राप्त, आदरणीय श्री परशुराम गंगावणे यांच्या हस्ते तर ज्येष्ठ समाजसेविका आदरणीय श्रीमती कमलताई परुळेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच राष्ट्रीय पंच आदरणीय श्री महेश दाभोलकर, कोकणसादचे उपसंपादक आदरणीय प्रा.रुपेश पाटील, वात्सल्य सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा आदरणीय सौ. नेहा परब यांच्या उपस्थितीत शाल सन्मानपत्र व सन्मानचिन्ह अशा स्वरूपात मराठा समाज ए.सी हाँल कुडाळ येथे रविवार दि.२६ फेब्रुवारी २०२३ रोजी सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहेत. यापूर्वीही त्यांना त्यांच्या सामाजिक बांधिलकीची जाण व भान ठेवून समाजाच्या उन्नतीसाठी व राष्ट्रीय एकात्मतेसाठी उल्लेखनीय कार्य तसेच विशेष कामगिरी करून राष्ट्रीय लौकिकात भर घालत असल्यामुळे अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष प्रा. डॉ. बी. एन. खरात यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन स्वागत केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा.वैभव खानोलकर यांनी केले.
Home Uncategorized रा. कृ. पाटकर हायस्कूलच्या उपक्रमशील शिक्षिका समृद्धी संजय पिळणकर – मूननकर यांचा...