Home स्टोरी रस्त्यावरील निराधार, वंचित, पिडीत बांधवांच्या सेवेतच खरी मानवता…!

रस्त्यावरील निराधार, वंचित, पिडीत बांधवांच्या सेवेतच खरी मानवता…!

127

मानवतेच्या कार्यात सहयोग देणा-या सर्वांना मनःपुर्वक धन्यवाद.

 

वसई पारनाका येथील निराधार वयोवृध्द नागरिक नासीर यांना मिळाला समर्थ आश्रमचा आधार.

 

नासीर यांच्या पायाच्या जख्मेतून २१ किडे काढुन संदिप परब यांनी केली त्यांची सेवा सुश्रुषा.

वसईः वसई पार नाका येथे गेले सात – आठ महिने नासिर (वय अंदाजे ६०) हे वयोवृध्द इसम पायाच्या जखमेत असंख्य किडे पडलेल्या अवस्थेत वेदनेने तळमळत निराधार जीवन जगत होते. या आजोबांविषयी जीवन आनंद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदिप परब यांना माहिती मिळताच त्यांनी नासीर यांची आज भेट घेतली.

आज संदिप परब यांनी हाडामासाचे जीवंत व्यक्ती असलेले निराधार नागरिक नासीर यांच्या पायातील जख्मेवर सुश्रुषा केली. त्यांच्या जख्मेतून २१ किडे काढले. त्यांची दाढी व केस कापुन, त्यांना स्वच्छ आंघोळ घातली. आणि पोलीसांच्या मदतीने नासीर यांना जीवन आनंद संस्थेच्या विरारफाटा येथील समर्थ आश्रमात दाखल केले.

नासीर यांना आश्रमात दाखल करीत असल्याच्या पार्श्वभुमिवर बोलताना, “वेदनेने पिडीत असलेल्या रस्त्यावरील निराधार वंचित बांधवांची सेवा हे मानवतेचे कार्य आहे. या कार्यासाठी रूग्णवाहिका उपलब्ध करून देणारे श्री.संतोषभाऊ वळवईकर, अहमद भाई, अरूणा ताई बापट, मान. हेमंत डोंगरे सर यांचेसह संस्थेतील सहकारी भाईदास माळी, गोविंद मार्गी व दिपकभाऊ अडसुळे या सर्वांना मी मनःपुर्वक धन्यवाद देत आहे.” अशा शब्दांत संदिप यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

संदिप परब हे गेली २१ वर्षांहून अधिक काळ रस्त्यावरील निराधार व वंचित वयोवृध्द नागरिक, शारिरीक व मानसिक दृष्टीने आजारी व जख्मी असलेले निराधार बांधवांसाठी कार्य करीत आहेत. निराधार बांधवांचे पुनर्वसन , शक्य तेथे कुटुंब पुनर्मिलन आणि त्यांना माणूस म्हणून सन्मानाचे जीवन जगता यावे यासाठी मुंबई, पालघर व सिंधुदुर्ग जिल्ह्यासह गोवा राज्यातील आश्रम आणि शेल्टर होम द्वारे जीवन आनंद संस्थेचे कार्य सुरू आहे.

किसन चौरे, विश्वस्त, जीवन आनंद संस्था