Home स्टोरी रस्त्यावर झाड पडल्याने काही काळ वाहतूक ठप्प!

रस्त्यावर झाड पडल्याने काही काळ वाहतूक ठप्प!

265

मालवण (मसुरे) प्रतिनिधी:

 

मसुरे देऊळवाडा दत्तमंदिर ते आंगणेवाडी या मुख्य रस्त्यावर पन्हळकरवाडी येथे रविवारी सायंकाळी झाड रस्त्यावर पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती. कट्टा आंगणेवाडी बस सुद्धा काहीकाळ तेथेच थांबून राहिली होती. याबाबत माहिती मिळताच माजी पंचायत समिती सदस्य महेश बागवे यांनी तेथे धाव घेत स्थानिक कार्यकर्ते नीलेश लाड, गणेश सांडव, दिनकर चव्हाण, किशोर बागवे, चंद्रकांत परब यांच्या मदतीने झाड बाजूला करून रस्ता वाहतुकीस मोकळा करून दिला. याबद्दल वाहन धारक आणि प्रवाशांनी महेश बागवे आणि ग्रामस्थांचे आभार मानले.