Home स्टोरी युवासेनेच्या इशाऱ्या नंतर जिल्हा परिषदला आली जाग,भजन साहित्याचे आज केले वाटप.

युवासेनेच्या इशाऱ्या नंतर जिल्हा परिषदला आली जाग,भजन साहित्याचे आज केले वाटप.

257

भजन मंडळांनी युवासेनेचे मानले आभार.

 

कुडाळ: जिल्हा परिषद च्या स्वनिधीतून जिल्ह्यातील भजन मंडळांना भजन साहित्य वाटप केलं परंतु चतुर्थी संपत आली तरी भजन साहित्य पोच न झाल्याने भजनी मंडळात नाराजी होती.काही भजन मंडळांनी ही व्यथा युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी यांच्याकडे मांडली होती.त्यानंतर युवासेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भजन करण्याचा इशारा दिल्यानंतर जिल्हा परिषद खडबडून जागी झाली. त्यांनी पंचायत समितीत सदर भजन साहित्य पाठवले. युवासेनेच्या आंदोलनाची धास्ती घेत जिल्हा परिषद ने भजन साहित्य घेऊन जाण्याचे आवाहन केले आहे. यासाठी भजन मंडळांनी युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी आणि युवासेनेचे मानले आभार.