Home स्टोरी मेट्रो चालकांमध्ये ७ महिलांची वर्णी !

मेट्रो चालकांमध्ये ७ महिलांची वर्णी !

158

५ ऑगस्ट वार्ता: मेट्रोमध्ये ७ महिला चालक असून या सातही महिलांचे पायलटचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. वनाज ते रुबी हॉल क्लिनिक आणि पिंपरी-चिंचवड ते सिव्हील कोर्ट या अंतरावर मेट्रोची सेवा १ ऑगस्टपासून चालू झाली. मेट्रोकडे असलेल्या १८ गाड्या या मार्गावर धावणार आहेत. मेट्रोकडे एकूण ५४ ट्रेन पायलट आहेत. त्यामध्ये ७ महिलांचा समावेश आहे. या सर्वांना पुणे मेट्रोकडून पुण्यामध्ये प्रशिक्षण दिले आहे, तसेच आपत्कालीन परिस्थितीमध्ये काय करायचे याचेही प्रशिक्षण दिले आहे.