कुडाळ: जन्मजात बालकापासून १८ वर्ष वयोगटातील मेंदूचे विकार, फिट्स, चक्कर, अपस्मार (epilepsy) यांनी ग्रस्त प्रवर्गातील मुलांसाठी तपासणी शिबीर दिनांक १५ नोव्हेंबर २०२५ रोजी महिला व बाल रुग्णालय, कुडाळ येथे आयोजित करणेत आलेले आहे. सदर शिबिरामध्ये MMR CHILDREN HOSPITAL, THANE येथून न्यूरो सर्जन आणि टीम उपस्थित राहणार आहेत. सदर शिबीरामध्ये मुलांना चक्कर येणे, दातखिळी बसणे ,डोकेदुखी, दृष्टी मध्ये बदल, वागणुकीतीतील बदल इत्यादी लक्षणे आढळणाऱ्या व अपस्मार ग्रस्त
बालकांची तपासणी करणेत येणार असून शस्त्रक्रियेस पात्र लाभार्थ्यांना मुंबई येथे खाजगी रुग्णालयात संदर्भीत करून त्यांचेवर मोफत उपचार करणेत येणार आहेत. तरी सदर प्रवर्गातील जास्तीत जास्त बालकांनी सदर शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. श्रीपाद पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक सिंधुदुर्ग यांनी केले आहे. अधिक माहिती साठी जिल्हा कार्यक्रम पर्यवेक्षक श्री राजेश पारधी 9422373188 यांच्याशी संपर्क साधावा







