Home स्टोरी मुरघास मशीन श्वेत क्रांतीची नांदी ठरेल! डॉ प्रसाद देवधर

मुरघास मशीन श्वेत क्रांतीची नांदी ठरेल! डॉ प्रसाद देवधर

188

चार लाख रुपयांच्या मुरघास मशीनचे मसुरेत उदघाटन.

 

मसुरे प्रतिनिधी: जिल्हा परिषदच्या सेस निधी मधून मंजूर झालेली जिल्ह्यातील ही पहिली मुरघास मशीन आहे. सिंधुदुर्गमधील पन्नास जिल्हा परिषद विभागामध्ये अशा मशीन आल्यास जवळच्या गावांचा चाऱ्यावर प्रक्रिया करण्याचा प्रश्न मिटणार आहे. जनावरांच्या बाबतीत माणूस विचार करतो तेव्हा समाज मोठा होतो. या मशीनमुळे जनावरांना चारा तोडणे सोपे होते. इथलं दूध दुभत वाढून प्रत्येक गावात गोकुळ नांदू दे! मक्याचे क्षेत्र इथे वाढत आहे. पण नुसता मका तोडून घालण्या ऐवजी प्रक्रिया करून घातल्यास जनावरांना चांगली रुची लागते. ही मुरघास मशीन श्वेत क्रांतीची नांदी ठरेल असे प्रतिपादन भगीरथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर प्रसाद देवधर यांनी मसूरे येथे केले.

येथील पावणाई देवी महिला दुग्ध उत्पादक सहकारी संस्था मसुरे बांदिवडे यांनी सुमारे चार लाख रुपये किमतीच्या नवीन खरेदी केलेल्या मुरघास मशीनचे उदघाटन भगीरथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ प्रसाद देवधर यांच्या प्रमुख उपस्थितीत बांदिवडे माजी उपसरपंच सतीश बांदिवडेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. प्रसाद देवधर यांनी तत्कालीन मुख्य कार्य अधिकारी प्रजित नायर यांनी जी. प. सेस निधीमधून पन्नास लाख रुपयांची तरतुद यासाठी केल्या बद्दल त्यांचे विशेष आभार मानले. पशु वैधकीय अधिकारी तुषार वेर्लेकर म्हणाले, जी प सेस निधीमधून एक मशीन साठी एक लाख रुपये अनुदान उपलब्ध आहे.गुरांच्या आहारात चाऱ्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे त्यामुळे ही मशीन गुरांसाठी अतिशय उपयुक्त आहे. दूध उत्पादनातुन जास्तीत जास्त उत्कर्ष येथील शेतकऱ्यांनी करावा असे आवाहन केले. डॉक्टर विश्वास साठे म्हणाले, या दूध उत्पादक संघाकडून येथील शेतकऱ्यांचे दूध संकलन वाढावे यासाठी सर्वतोपरि प्रयत्न करण्यात येतील. जिल्हा बँकेचे सुद्धा चांगले सहकार्य यासाठी लागत आहे.

यावेळी जिल्हा पशु संवर्धन अधिकारी डॉ. एस. बी. ठाकूर, पशु वैधकीय अधिकारी डॉ तुषार वेर्लेकर, डॉ ए. एस. शिरसाट, सरपंच संदीप हडकर, संस्था अध्यक्ष सौ. अलका विश्वास साठे, देऊळवाडा मसुरे वि. का. स. सोसायटी अध्यक्ष डॉ. विश्वास साठे, शाखाधिकारी संतोष गावकर, वेरल उपसरपंच दिनेश परब, कट्टा हाय मुख्या. संजय नाईक, पेंडुर दूध संस्था संचालक पपू राणे, पोलीस विवेक फरांदे, साई बागवे, पांडुरंग ठाकूर, नारायण परब, संकेत पेडणेकर, सिद्धेश मसुरकर, सचिन गोलतकर, श्री पवार, अभिजित घाडीगांवकर, मारुती सावंत, सुनील घाडीगांवकर, सचिन बागवे, निलेश लोके, अनिल असवलकर, महेंद्र हिर्लेकर आदी शेतकरी उपस्थित होते. आभार डॉ विश्वास साठे यांनी मानले.