Home स्टोरी मुणगे येथील रस्त्यावर मिठबाव येथील युवकाचा रक्तबंबाळ अवस्थेत आढळला मृतदेह!

मुणगे येथील रस्त्यावर मिठबाव येथील युवकाचा रक्तबंबाळ अवस्थेत आढळला मृतदेह!

401

देवगड: देवगड तालुक्यातील मुणगे येथील रस्त्यावर मिठबाव येथील युवकाचा रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह  रस्त्याच्या मधोमध उलटा पडलेल्या स्थितीत मृत अवस्थेत आढळून आला आहे. गाडीचा पुढील दरवाजा उघडलेल्या अवस्थेत असून गाडीच्या काचीवर आणि दरवाज्यावर अवघड वस्तूने आघात केल्यासारखे खुणा दिसून येत आहेत. याबाबत नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली असता देवगड पोलिस तात्काळ घटनास्थळी पोहचले आहेत. प्रथम दर्शनी अपघात वाटत असला तरी घातपाताची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे.

घटनेची माहिती मिळताच मिठबाव गावचे सरपंच भाई नरे यांनी आजूबाजूच्या ग्रामस्थांना घेऊन घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी उपविभागीय अधिकारी किशोर सावंत,पोलीस उपनिरीक्षक सूधीर कदम, राजन जाधव, प्रसाद आचरेकर, स्वप्नील भोवर, स्वप्नील ठोबरे, यांसहडाग स्कॉड, फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. सदर युवक मिठबांव (आडारी वाडी) येथील प्रसाद पर्शुराम लोके असल्याचे समजते.