Home स्टोरी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचं निलंबन मागे……

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचं निलंबन मागे……

164

१२ मे वार्ता: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचं निलंबन मागे घेण्यात आलं आहे. शिंदे-फडणवीस सरकराने हा मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त असताना परमबीर सिंह यांच्यावर २०२१ मध्ये गंभीर आरोप करण्यात आले होते. त्यानंतर त्यांचं निलंबन झालं होतं. याविरोधात त्यांनी अपील केली होती. आता या अपीलनुसार त्यांच निलंबन मागे घेण्यात आलं आहे, असं सांगण्यात येत आहे.त्यांचं फक्त निलंबन मागे घेण्यात आले नाही, तर त्यांचा जो निलंबनाचा काळ आहे, तो ते ड्युटीवर असल्याचं गृहीत धरलं जाणार आहे. यामुळे परमबीर सिंह यांना मोठा दिलासा मिळाला आहे.