Home स्टोरी मुंबईचे माजी नगरसेवक शैलेश परब यांना मातृशोक!

मुंबईचे माजी नगरसेवक शैलेश परब यांना मातृशोक!

249

मसुरे प्रतिनिधि: कांदळगाव येथील मूळ रहिवासी आणि मुंबई जोगेश्वरी येथे वास्तव्यास असलेल्या समाजसेविका शैलजा दत्ताराम परब ( ७९ वर्षे ) यांचे मुंबई येथे मंगळवारी रात्री त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. बुधवारी सकाळी जोगेश्वरी येथील स्मशानभूमीत विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. शैलजा यांचे मुंबई जोगेश्वरी तसेच कांदळगाव गावामध्ये सामाजिक क्षेत्रात मोठे नाव होते. अनेक गरजवंतांना त्यांनी वेळोवेळी मदतीचा हात दिला होता.

सामाजिक, कला, क्रीडा, राजकिय क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांचे कार्य महान होते.त्यांच्या पश्चात १ मुलगा, १ मुलगी, सून, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. सावंतवाडी विधानसभा मतदार संघाचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संपर्कप्रमुख आणि मुंबई महानगर पालिकेचे माजी नगरसेवक तसेच भारतीय कामगार सेनेचे चिटणीस, समाजसेवक शैलेश परब यांच्या त्या मातोश्री होतं आणि मुंबई महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका शिवानी शैलेश परब यांच्या त्या सासू, आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग चे खासदार विनायक राऊत यांच्या त्या मानस बहीण होत्या.