Home शिक्षण मिलाग्रीसची काव्या गावडे नृत्य स्पर्धेमध्ये तृतीय..!

मिलाग्रीसची काव्या गावडे नृत्य स्पर्धेमध्ये तृतीय..!

194

सावंतवाडी: वेताळ प्रतिष्ठान तुळस आयोजित नृत्य स्पर्धेमध्ये मिलाग्रिस प्रशालेच्या काव्या गावडे हिने तृतीय क्रमांक मिळविला आहे. प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा यांनी प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन या विद्यार्थिनीचा गौरव केला. यावेळी प्रशालेच्या उप मुख्याध्यापिका सिस्टर मेबल कार्व्हालो,पर्यवेक्षिका सौ.मेघना राऊळ तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.