Home स्टोरी मिरा रोड येथील भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर नाट्य गृहात रंगला मालवणी भाषेचा...

मिरा रोड येथील भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर नाट्य गृहात रंगला मालवणी भाषेचा जागर.

116

कणकवली येथील अक्षर सिंधु साहित्य मंचची ” शबय ” ठरली सर्वोत्कृष्ट मालवणी एकांकिका.

मुंबई प्रतिनिधी: रविवार दिनांक २१ एप्रिल रोजी मिरा रोड येथील भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर नाट्य गृहात ” आम्ही मालवणी ” या दोन लाखाच्या आसपास सदस्य संख्या असलेल्या फेसबुक समूहांने प्रथमच आयोजित केलेल्या मालवणी एकांकिकेची अंतिम फेरी दणक्यात पार पडली.

 

अंतिम फेरीत एकूण सहा एकांकिका सादर झाल्या. त्यातून चार एकांकिका पारितोषिक प्राप्त ठरल्या.कणवली येथील अक्षर सिंधु साहित्य मंचने सादर केलेली ” शबय ” ही एकांकिका सर्वोकृष्ट एकांकिका ठरली,तर मुंबईच्या ” सृजन द कला क्रिएशन च्या ” श्यान पण देगा देवा “ला द्वितीय एकांकिकेचा मान मिळाला. अमर क्रिएशन, नेतर्डे सावंतवाडीची वॅारंट तिसरी तर, श्री गणेश कला मंच,कणकवली च्या ” जापसाल ” ला उत्तेजनार्थ बक्षिस देण्यात आले.

अंतिम फेरीचे परिक्षण ज्येष्ठ लेखक,दिग्दर्शक, नाट्यप्रशिक्षक श्री.संभाजी सावंत ,अभिनेते,गणेश रेवडेकर,व अभिनेत्री सीमा घोगळे यांनी केले.हे तिन्ही परिक्षक मालवणी मुलखातील असल्यामुळे त्यांनी एकमुखाने दिलेल्या निर्णयाचे रसिक प्रेक्षकांनी ,आणि स्पर्धक संघांनी ही स्वागत केले.या स्पर्धेला मालवणी प्रेमींचा हाऊसफुल प्रतिसाद लाभला होता.

आम्ही मालवणीच्या या एकांकिका स्पर्धेला मिरा भायंदरचे माजी आमदार श्री.नरेंद्र मेहता,नगरसेविका सौ.सुरेखा सोनार,कोकण मंच मिरा भायंदरचे श्री.दादा सावंत,श्री.कानडे,श्री.आशिष दळवी,श्री.लक्ष्मण दाभोळकर,श्री.मनोज राणे, कणकवलीचे विष्णू सातवसे वगैरे.त्याच बरोबर नामवंत अभिनेते श्री.नागेश भोसले,होम मिनिस्टर या कथा बाह्य कार्यक्रमाचे दिग्दर्शक महेंद्र कदम,कॅामेडी एक्सप्रेस ” चे लेखक श्री.प्रशांत लोके,नाट्यलेखक श्री दत्तात्रय पेडणेकर, श्री.विजय टाकळे ,संगीतकार प्रणय दरेकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

या एकांकिका स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून दिग्दर्शक,नाट्यप्रशिक्षक श्री.वामन केंद्रे, जेष्ठ अभिनेते श्री.प्रदीप कबरे,कलर्स वाहिनीवरील श्री.स्वामींची भूमिका करणारे श्री.अक्षय मुडावदकर, सतेज दळवी, श्रावणी सावंत, आम्ही मालवणी प्रमुख कार्यवाह एकांकिका स्पर्धा विठ्ठल सावंत,प्रदीप तोंडवळकरहे उपस्थित होते.या प्रसंगी श्री.वामन केंद्रे सर यांनी स्पर्धक रंगकर्मींना मोलाचे मार्गदर्शन केले.या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विजेत्या संघांना पारितोषिके देऊन स्पर्धेची सांगता झाली.या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आम्ही मालवणी समूहाचे सदस्य व या एकांकिका स्पर्धेचे प्रमुख कार्यवाह श्री.विठ्ठल सावंत यांनी केले.

आम्ही मालवणीची ही पहिलीच एकांकिका स्पर्धा यशस्वी करण्यात संचालक श्री,सतेज दळवी,श्रावणी सावंत ,स्पर्धा प्रमुख कार्यवाह विठ्ठल सावंत,प्रदीप तोंडवळकर यांच्या बरोबरींने सदस्य आशीष राणे,सुमित राणे,अमित चाळके,संदीप कानडे,गोविंद जाधव,निलिमा रसाळ,मंजिरी लाड,नीलेश सावंत,सौरभ चव्हाण,पवन राऊळ,अजय गावडे,अमित गावडे यांनी विशेष मेहनत घेतली. एकांकिका स्पर्धचे व्हिडिओ द्वारे प्रसार करणारे अभिनेते,भाऊ कदम,पॅडी कांबळे,समीर चौगुले,अक्षय मुडावदकर,भरत सावले,लेखक कवी,डाॅ.महेश केळुस्कर,हास्यजत्राचे निर्माते लेखक दिग्दर्शक सचीन गोस्वामी,भजन सम्राट रामदास कासले,दशावतारी कलावंत,दादा राणे कोनस्कर, नीळकंठ सावंत, श्री.प्रकाश साळुंके,आर्थिक भार उचलणारे सर्व देणगीदार,सर्व हितचिंतक,लता मंगेशकर नाट्यगृहाचे व्यवस्थापक, कर्मचारी, नेपथ्यकार उल्हास सुर्वे,रंगभूषाकार शरद सावंत यांचे यावेळी विशेष आभार व्यक्त करण्यात आले.

ही आमची पहिलीच स्पर्धा असल्यामुळे काही त्रुटी राहिल्या असतील तर पुढील स्पर्धेत त्या नक्कीच भरून काढू.ही आपली मालवणी परिवाराची स्पर्धा आहे तेव्हा आपण असेच सहकार्य करीत रहा कारण आपला पाठिंबा असेल तरच ही स्पर्धा सुरु राहणार आहे.आपला उद्देश एकच आहे आपल्या मालवणी भाषेचे जतन करणे असे यावेळी बोलताना एकांकिका स्पर्धेचे प्रमुख कार्यवाहक विठ्ठल सावंत यांनी बोलताना सांगितले. तसेच संचालक सतेज दळवी, श्रावणी सावंत,प्रदीप तोंडवळकर यांनी सुद्धा यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले.या स्पर्धेला मालवणी प्रेमींचा हाऊसफुल प्रतिसाद लाभला होता.