Home स्टोरी माळगाव येथे २६ रोजी दत्त जयंती उत्सव…!

माळगाव येथे २६ रोजी दत्त जयंती उत्सव…!

152

मसुरे प्रतिनिधी: माळगाव मिरवेलवाडी येथे तेथील ग्रामस्थ तसेच विठू हडकर मित्रमंडळाने दत्त जयंतीनिमित्त २६ डिसेंबर रोजी विठू हडकर यांच्या निवासस्थानी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सकाळी ८ वा. अभिषेक, दुपारी १२ वा. आरती, १ वा. तीर्थप्रसाद व महाप्रसाद, ३ वा. बुवा अमित मेस्त्री यांचे भजन, ४ वा. बुवा अनिल परब यांचे भजन, सायं. ५ पासून स्थानिक भजने होतील. रात्री ९ वा. मालवीर भूतनाथ महिला भजन मंडळ, पाळेकरवाडी-देवगडच्या बुवा ऋतुजा पाळेकर (पखवाज-सुपल, परब) व भैराई देवी महिला भजन मंडळ, मोंड गावठाणवाडी-देवगडच्या बुवा स्वराली नाटेकर (पखवाज-अभिषेक नाईकधुरे, तबला-दियोग भाटकर) यांच्यात डबलबारी भजन होणार आहे.