Home शिक्षण मालवण दांडी शाळेमध्ये शाळा पूर्वतयारी मेळावा संपन्न

मालवण दांडी शाळेमध्ये शाळा पूर्वतयारी मेळावा संपन्न

80

मालवण प्रतिनिधी: मालवण दांडी शाळेमध्ये शाळा पूर्वतयारी मेळावा २०२३ चे आयोजन करण्यात आले होते. मुलांच्या शिक्षणात माता पालकांचा सहभाग वाढावा गावात शैक्षणिक वातावरण निर्माण व्हावे ५ ते ७ या वयोगटातील जी मुले या वर्षी पहिल्या वर्गात दाखल होणार आहेत त्यांना अंक ओळख,अक्षर ओळख, सोप्या शब्दांचे वाचन, पूर्ण वाक्यात बोलता यावे, जेणेकरून पुढे जाऊन त्या मुलांना वाचन लेखन करताना कोणतेही अडथळे निर्माण होऊ नये याकरिता या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी शाळेत या मुलांना पुष्प देऊन व मुकुट घालुन स्वागत करण्यात आले. तदनंतर मेळाव्याचे उद्घाटन शा.व्य.समिती शिक्षणप्रेमी सदस्य श्री.दिनकर शेलटकर यांनी दीप प्रज्वलन करुन केले. मुख्या.सौ.विशाखा चव्हाण, पदविधर शिक्षक श्री.शिवराज सावंत, सौ.मनीषा ठाकुर, श्री.रामदास तांबे,अंगणवाडी सेविका सौ.राधिका मोरजकर, सौ.कांचन परब, सौ.मनिषा बाणावलीकर, जेनी मॅडम, सौ.रेवंडकर, सौ. सारंग व माता पालक यांच्या शुभहस्ते पहिलीत दाखल होणा-या मुलांचे स्वागत करण्यात आले. उपस्थित पालकांना श्री शिवराज सावंत,सौ मनीषा ठाकुर यांनी मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन श्री. रामदास तांबे यांनी केले. मेळाव्याला दांडी शाळा पालक व दांडी ग्रामस्थ उपस्थित होते.

मेळावा यशस्वी करण्यासाठी मुख्या.सौ.विशाखा चव्हाण, राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक श्री.शिवराज सावंत, सौ.मनीषा ठाकूर, श्री.रामदास तांबे सर, दांडी अंगणवाडी सेविका सौ.राधिका मोरजकर, मदतनीस सौ.जेनी मॅडम, दांडी महापुरुष अंगणवाडी सेविका सौ.कांचन परब मँडम, मदतनीस सौ.मनीषा बाणावलीकर मॅडम यांनी विशेष मेहनत घेतली.