Home स्टोरी मालवण आयटीआय मध्ये “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण” मेळावा !

मालवण आयटीआय मध्ये “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण” मेळावा !

121

मसुरे प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्यातील बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण” ही योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत विविध कंपन्या, आस्थापना, शासकीय, निमशासकीय व खाजगी संस्था/ कार्यालये, इ. मध्ये सहा महिन्यांसाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मालवण या संस्थेमध्ये २४ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सदरील मेळाव्यासाठी मालवण तालुक्यातील विविध कंपन्या, आस्थापना यांचे नियोक्ता उपस्थित राहणार आहेत.

उमेदवार दहावी अथवा बारावी उत्तीर्ण असल्यास रू. ६०००/- विद्यावेतन, उमेदवार औ.प्र.संस्था अथवा पदविका प्रशिक्षण उत्तीर्ण असल्यास रू. ८०००/- विद्यावेतन, उमेदवार पदवीधर अथवा पदव्युत्तर उत्तीर्ण असल्यास रू. १०,०००/- विद्यावेतन महाराष्ट्र शासनाकडून मिळणार आहे. मालवण तालुक्यातील बेरोजगार उमेदवारांनी सदरील मेळाव्यासाठी उपस्थित रहावयाचे आवाहन प्राचार्य सचिन संखे यांनी केले आहे.