सावंतवाडी प्रतिनिधी: मा खासदार विनायकजी राऊत साहेब,मा आमदार वैभवजी नाईक यांच्या माध्यमातून माणगाव आंबेरी नदीवर नवीन पूल मंजूर करून पूर्णत्वास येत आहे. जुने आंबेरी पूल न तोडता त्यावर बंधारा तयार करून पाणी अडवावे जेणेकरुन पाण्याची पातळी वाढेल, त्याचबरोबर तालुक्यातील ब्रिटिश कालीन पुलाचा नमुना म्हणून जतन होईल. श्रीमंत बापूसाहेब भोसले यांनी खास माणगांव खोऱ्यासाठी हे पूल बांधून घेतले होते. आंबेरी पूल न पडता त्यावर बंधारा बांधून श्रीमंत बापूसाहेब भोसले यांची आठवण अबाधीत राहील.आंबेरी पूल न तोडता त्यावर बंधारा बांधवा निवेदनाद्वारे अशी विनंती केली.यावेळी श्रीमती अनामिका जाधव यांना निवेदन दिले यावेळी युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी,शिवसेना उपविभागप्रमुख श्री एकनाथ धुरी उपस्थित होते.
Home स्टोरी माणगाव आंबेरी नदीवरचं जून पूल न तोडता,त्यावर बंधारा बांधावा !युवासेना तालुकाप्रमुख योगेश...