Home स्टोरी माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारिंवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयाने...

माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारिंवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळली!

84

माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्यावरून राज्यात अनेक राजकीय आणि वादग्रस्त घडामोडी घडल्या. तुम्हाला कोणी विचारले की तुमचा आदर्श कोण, तर बाहेर बघायची गरज नाही. इथे महाराष्ट्रात अनेक आहेत. शिवाजी जुन्या काळातील आहेत. मी नव्या युगाबद्दल बोलतोय’, असे वक्तव्य कोश्यारी यांनी केले होते. माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेली विधाने ही इतिहासाचे विश्लेषण करणारी होती, असे निरीक्षण नोंदवित छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले व जोतिबा फुले यांच्याविषयी केलेल्या व्यक्तव्यांबाबत त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याची मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळून लावली. कोश्यारींच्या विधानांचा सखोल विचार केल्यास हेतू स्पष्ट होतो. सध्याच्या काळात आपण इतिहासातून शिकले पाहिजे, असे न्या. सुनील शुक्रे व न्या. अभय वाघवासे यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले. थोर व्यक्तींचा अनादर करणारी विधाने म्हणून याकडे पाहिले जाऊ शकत नाही, असेही न्यायालयाने नमूद केले.