Home स्टोरी माजी नगरसेविका शीतल मंढारी यांच्या प्रयत्नाने कल्याण पूर्व – राजभर नगर परिसरातील...

माजी नगरसेविका शीतल मंढारी यांच्या प्रयत्नाने कल्याण पूर्व – राजभर नगर परिसरातील पाणी समस्या संपुष्ठात.

122

४० लाख रुपयांच्या निधी मंजूरीतून जलवाहिनी टाकण्याचा शुभारंभ!

कल्याण प्रतिनिधी: (आनंद गायकवाड): – कल्याण पूर्वेतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या एकमेव माजी नगरसेविका श्रीमती शितल मंढारी यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या ४० लाख रुपयांच्या निधीतून राजभर नगर परिसरासाठी नवीन जलवाहीण्या टाकण्याच्या कामाचा शुभारंभ रविवारी दुपारी स्थानिक नागरीकांच्या उपस्थितीत करण्यात आला . या जलवाहिन्यांमुळे गेली अनेक वर्षे या परिसरात भेडसावणारी पाणी समस्या संपुष्ठात येणार असल्याने परिसरातील नागरीकांत समाधान व्यक्त करण्यात येत आहे .शिवसेना पक्ष फुटी नंतर कल्याण पूर्वेतील बहुतांशी शिवसेना नगरसेवकांनी शिंदे गटात उडी घेवून भविष्यातील आपले नगरसेवकपद अबाधीत राखण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु श्रीमती शितल मंढारी यांनी भविष्यातील सत्तेचा विचार न करता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचेशी एकनिष्ठ राहून पक्षाबरोबरोबरची आपली निष्ठा कायम राखत त्यांनी आपले कर्तव्य पार पाडण्याचा क्रम चालूच ठेवला आहे , याच कर्तव्य भावनेतून त्यांनी पालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून राजभर नगर प्रभाग क्र ९८ च्या नागरीकांच्या पाणी समस्यांवर कायम स्वरूपी उपाय योजना करण्यासाठी ३००, २५० आणि १५० मी. मी. व्यासाच्या आवश्यकतेनुसार जलवाहीण्यासाठी ४० लाखांचा निधी मंजूर करून आणला आहे. या कामाचा शुभारंभ स्थानिक नागरीकांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आला. या वेळी शितल मंढारी यांनी सांगितले की, या परिसरात स्थानिक जागा मालकांच्या सहकार्याने जलकुंभ उभारण्याचाही प्रयत्न केला जाणार आहे. या समयी स्थानिक नागरीक आणि महिला उपस्थित होत्या.