Home शिक्षण मागासवर्गीय एज्यूकेशन सोसा. मांडकुली- केरवडे संचलित प. पू. आप्पासाहेब पटवर्धन माध्य. विद्यालयाचा...

मागासवर्गीय एज्यूकेशन सोसा. मांडकुली- केरवडे संचलित प. पू. आप्पासाहेब पटवर्धन माध्य. विद्यालयाचा व वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न.

63

सावंतवाडी प्रतिनिधी: मागासवर्गीय एज्यूकेशन सोसा. मांडकुली- केरवडे संचलित प. पू. आप्पासाहेब पटवर्धन माध्य. विद्यालयाचा व वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. या प्रसंगी व्यासपीठावर संस्था अध्यक्ष श्री. श्रीधर पेडणेकर, प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. हिरोजी उर्फ रुपेश परब हॉटेल परबचे मालक- कोल्हापूर ,सामाजिक कार्यकर्ते श्री. रुपेशजी कानडे तेर्से बांबर्डे, संस्था सचिव श्री. अंकुश जाधव, कार्याध्यक्ष श्री. वामन गावडे, खजिनदार श्री. देवदत्त चूबे, संस्था उपसचिव श्री. दत्ताराम साळसकर, उपखजिनदार सौ. करिष्मा भोई, संस्था संचालक श्री. मोहन भोई, श्री. केशव पेडणेकर, श्री. तातू मूळीक, श्री. हरिश्चंद्र जाधव, श्री. सचिन ठाकूर, श्री. श्रावण बांदेलकर, मांडकुली सरपंच सौ. गौतमी कासकर, केरवडे सरपंच सौ. श्रिया ठाकूर, तेर्से बांबर्डे उपसरपंच सौ. रोहिणी हळदणकर,पोलीस पाटील अमीत मराठे, श्री. अजिंक्य जाधव, श्रीम. शुभांगी परब, पत्रकार योगीता कानडे,इ . मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

दिपप्रज्वलन व सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक मुख्याध्यापक श्री. खोत सर यांनी केले. मान्यवरांच्या हस्ते शालांत परीक्षेतील प्रथम तीन क्रमांक व इ.८ वी, इ.९ वी माधील प्रथम तीन क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना ठेवीवरील व्याजातून त्याच बरोबर ग्रामपंचायत मांडकूली यांजकडून भेट वस्तू देवून गौरव करण्यात आला. संस्था अध्यक्ष यांनी शालांत परीक्षेत उत्तीर्ण प्रथम तीन क्रमांकास रोख रक्कम बक्षीस म्हणून दिली.तसेच शालांत परीक्षेत विविध निकषानुसार हिंदी विषयात प्रथम आलेल्या कुमारी प्रिया प्रसाद नाईक हिला कोकण विभागीय बोर्डाने बक्षीस म्हणून पाठवलेला 1000 रूपयाचा धनादेश प्रदान करण्यात आला.प्रमुख अतिथी श्री. रुपेश परब यांनी मी या शाळेतून कसा घडलो याबाबत विचार व्यक्त करून प्रशालेचे ऋण व्यक्त केले. प्रशालेस रक्कम रु.५०००/ किंमतीची सरस्वतीची मुर्ती व रोख रक्कम रू.१००००/ प्रशालेस देणगी दिली. संस्था संचालक श्री. विष्णू परब यांनी यशस्वी विद्यार्थ्यांना रु. ३५५५ रक्कमेची वस्तू स्वरूपात बक्षीसे दिली.सन्मा. रुपेश कानडे यांनी ग्रामीण भागातील विद्यालय असूनही करीत असलेल्या शै. कार्याचे कौतुक करून प्रशालेस व संस्थेस सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन देत प्रशालेस रोख रू.१००००/ ची देणगी दिली. संस्था अध्यक्ष श्री. श्रीधर पेडणेकर यांनी संस्थेचे पुढील व्हीजन मांडून सर्वाना सहकार्याचे आवाहन केले. यानंतर उपस्थीत मान्यवर श्री . हिरोजी परब यांचा संस्थेचे अध्यक्ष श्री श्रीधर पेडणेकर, श्री. रुपेश कानडे यांचा संस्थेचे कार्याध्यक्ष श्री. वामन गावडे यांच्या हस्ते, श्रीम. शुभांगी परब यांचा सौ. करिष्मा भोई यांच्या हस्ते, पेडणेकरवाडी मित्रमंडळाचा संस्थेचे सचिव श्री. अंकुश जाधव यांच्या हस्ते, सांस्कृतीक कार्यक्रमस सहकार्य करणारे श्री . अक्षय कासले यांचा श्री. चुबे सर यांच्या हस्ते, तर संस्था अध्यक्ष श्री. श्रीधर पेडणेकर यांचा प्रमुख पाहुणे श्री . हिरोजी परब यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला . दि.२३-०१-२०२५ रोजी सकळच्या सत्रात सहशालेय उपक्रमातील यशस्वी विद्यार्थ्यांचा पारितोषीक वितरण कर्यक्रम पार पडला. सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री. हेमंत पेडणेकर निवृत्त प्राचार्य मुंबई हे उपस्थीत होते. श्री. हेमंत पेडणेकर सरानी विद्यार्थ्यांना परिक्षेला जातना तणावमुक्त कसे रहावे याचे मार्गदर्शन करून विद्यालयास शै साहित्य भेट देण्याचे जाहीर केले. सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. गोवेकर सर यांनी, अवाहल वाचन सौ. रांगणेकर मॅडम यांनी केले. विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन कायक्रमात नाटीका, नृत्य इ. सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. कानडे सर, श्री . विकास परब , श्री नाना जाधव , श्री . संजय गोसावी,अक्षय कासले श्री . निलेश भोई इ विशेष परिश्रम घेतले. संस्थेच्या वतीने सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचा गौरव करण्यात आला. आभार प्रदर्शन श्री. सरवटे सर यांनी मानले व कार्यक्रमचा समारोप करण्यात आला.