सावंतवाडी: येथील स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शनासाठी अग्रगण्य असलेल्या महेंद्रा अकॅडेमीचे संचालक महेंद्र पेडणेकर यांना त्यांच्या स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेलच्या वतीने ‘प्रेरणादायी युवा’ पुरस्कार सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व गुलाब पुष्प असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले, सावंतवाडी नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेलचे मुख्य संपादक सिताराम गावडे, सौ. संयुक्ता गावडे, माजी उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर, सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील, माजी नगरसेवक बाबू कुडतरकर, सुरेश भोगटे, विलास जाधव, डॉ. दत्तात्रय सावंत, श्रीमती स्वार, सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष हरिश्चंद्र पवार, यशस्वी युवा उद्योजक सिद्धांत परब, ज्येष्ठ पत्रकार राजू तावडे, माडखोलचे माजी सरपंच संजय लाड, चौकुळ गावाचे सामाजिक कार्यकर्ते व यशस्वी उद्योजक दिनेश गावडे यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविक मुख्य संपादक सिताराम गावडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रुपेश पाटील यांनी तर आभार प्रदर्शन विशाल पित्रे यांनी केले.