Home स्टोरी महाराष्ट्रात ‘एंटेरो कॉक्ससॅकी’ विषाणूमुळे ५ लाखांहून अधिक लोक डोळ्यांच्या साथीने ग्रस्त !

महाराष्ट्रात ‘एंटेरो कॉक्ससॅकी’ विषाणूमुळे ५ लाखांहून अधिक लोक डोळ्यांच्या साथीने ग्रस्त !

121

सिंधुदुर्ग प्रतिनिधी: राज्यात डोळ्यांची साथ ‘एंटेरो फॅमिलीतील कॉक्ससॅकी’ या विषाणूमुळे आली आहे. वातावरणातील आर्द्रतेमुळे झपाट्याने डोळ्यांच्या साथीचा संसर्ग होऊन रुग्णसंख्या ५ लाखांहून अधिक झाली आहे. ‘कॉक्ससॅकी’ विषाणू धोकादायक नसला, तरी काळजी घेणे आवश्यक आहे. रुग्णांची थुंकी किंवा खोकला यांतून तो पसरतो. या रुग्णांनी हात लावलेल्या वस्तूंना स्पर्श केला आणि ते हात आपल्या तोंडावर फिरवल्यानंतरही या विषाणूचा संसर्ग होतो. कोरोना विषाणूप्रमाणे त्याचा नवीन ‘स्ट्रेन’ पडताळण्यासाठी ‘जीनोम सिक्वेन्सिंग’ केले जाणार असून यातून पुढील धोके लक्षात येतील, अशी माहिती राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने (‘एन्.आय.व्ही.’ने) दिली आहे.

 

राज्यातील जवळपास सर्वच शहरांत डोळे येण्याची साथ चालू आहे. सर्वाधिक रुग्ण पुणे आणि बुलढाणा जिल्ह्यांत असून रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे.