Home राजकारण महाराष्ट्राचे अराजध्य दैवत असलेल्या विठ्ठलाची उपमा एखाद्या राजकीय नेत्याला देणं शोभतं का?...

महाराष्ट्राचे अराजध्य दैवत असलेल्या विठ्ठलाची उपमा एखाद्या राजकीय नेत्याला देणं शोभतं का? तुषार भोसले

161

८ जुलै वार्ता: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अजित पवारांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट तयार झाले आहेत. यादरम्यान अजित पवार गटाकडून साहेब आमचे विठ्ठल आहेत. पण त्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलं आहे, असे विधान करण्यात आलं. यावरून आता नवीन वाद पेटण्याची शक्यता आहे. भाजपच्या आध्यात्मिक आघाडीकडून अजित पवार गटाला याबद्दल इशारा देण्यात आला आहे. शरद पवार यांना विठ्ठल म्हणून संबोधणं तत्काळ थांबवा नाहीतर रस्त्यावर उतरू असा इशारा भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी दिला आहे. महाराष्ट्राचे अराजध्य दैवत असलेल्या विठ्ठलाची उपमा एखाद्या राजकीय नेत्याला देणं शोभतं का? म्हणून शरद पवारांना विठ्ठल संबोधणं तात्काळ थांबवा अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरून तुमच्या विरोधात आंदोलनं करावी लागतील, असे तुषार भोसले म्हणाले आहेत.