Home स्टोरी महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यादरम्यान उष्माघातामुळे ११ जणांचा मृत्यू.

महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यादरम्यान उष्माघातामुळे ११ जणांचा मृत्यू.

111

सिंधुदुर्ग: आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात उष्माघाताचा तडाखा बसलेल्यांवर नवी मुंबई, कळंबोली, कामोठे, परिसरातील विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ८ व्यक्तींना डिशचार्ज देण्यात आला आहे. कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी भेट देऊन उपचार घेणाऱ्या श्री सदस्यांची विचारपूस केली आहे. मुख्यमंत्री यांनी मयतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाखाची मदत जाहीर केली आहे. पुरस्कार सोहळ्याचा कार्यक्रम हा सकाळी १० ते दुपारी ३ या कालावधीत भर उन्हात झाला. या कार्यक्रमात अनेक त्रुटी असल्यामुळे आणि उन्हाची तीव्रता जास्त असल्यामुळे उष्मघाताने या कार्यक्रमात लोकांचा जीव गेला असल्याचे आरोप होत आहेत.सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या कार्यक्रमाची वेळ ही स्वत: धर्माधिकारी यांनी दिली होती असे सांगून आपली जबाबदारी नाकारली आहे. ज्या ११ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यापैकी १० जणांची ओळख पटली आहे.