Home शिक्षण महाराष्ट्र पुणे बोर्डाच्या दहावी-बारावीचे निकाल १० जूनपर्यंत लागणार?

महाराष्ट्र पुणे बोर्डाच्या दहावी-बारावीचे निकाल १० जूनपर्यंत लागणार?

61

सिंधुदुर्ग प्रतिनिधी: पुणे बोर्डाच्या माध्यमातून फेब्रुवारी-मार्च महिन्यात दहावी-बारावीची परीक्षा घेण्यात आल्या. कोरोनानंतर पहिल्यांदाच पूर्वीप्रमाणेच परीक्षा घेण्यात आली. परीक्षेनंतर शिक्षकांनी मुदतीत उत्तरपत्रिकांची तपासणी केली आहे. सर्व उत्तरपत्रिकांची तपासणी झाल्यावर आता निकालाची तयारी सुरु झाली आहे. बोर्डाकडून निकालाच्या दृष्टीने आवश्यक ९०% काम पूर्ण झाल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. दहावी-बारावीनंतर पुढील प्रवेशासाठी विलंब होणार नाही, याची खबरदारी बोर्डाकडून घेतली जात आहे. त्या अनुषंगाने निकाल वेळेत लागावेत, असे नियोजनही बोर्डाने केले आहे. मे अखेरीस किंवा ३ ते ४ जूनपर्यंत निकाल लागेल, असेही बोर्डाने स्पष्ट केले आहे. त्यानंतर सहा ते आठ दिवसांत म्हणजेच १० जूनपर्यंत दहावीचा निकाल लागावा, अशीही तयारी झाली आहे.