मसुरे प्रतिनिधि: महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड एग्रीकल्चर च्या सदस्यपदी मसुरे गावचे सुपुत्र दत्तप्रसाद पेडणेकर यांची निवड नुकतीच करण्यात आली. या अभिनंदनीय निवडी बद्दल दत्तप्रसाद पेडणेकर यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
यावेळी महाराष्ट्र चेंबर कॉमर्स चे अध्यक्ष श्री ललित गांधी, उपाध्यक्ष डॉक्टर दीपक परब, ट्रस्ट बोर्ड चेअरमन श्री आशिषजी पेडणेकर यांच्या हस्ते दत्तप्रसाद पेडणेकर यांना इचलकरंजी येथे शुभेच्छा देण्यात आल्यात. या वेळी कल्लाप्पा आण्णा जनता सहकारी बँकेचे चेअरमन स्वप्निल आवाडे, ट्रस्ट बोर्ड चेअरमन श्री आशिष पेडणेकर, माजी अध्यक्ष संतोष मंडलेचा,जव्हार इंडस्ट्रीज संचालक रोहित आवडे, वरिष्ठ उपाध्यक्ष उमेश दाशरथी, उपाध्यक्ष करुणाकर शेट्टी, उपाध्यक्ष शुभांगी तिरोडकर, उपाध्यक्ष रवींद्र माणगावे, उपाध्यक्ष तनसुख झांबड, उपाध्यक्ष कांतीलाल चोपडा, उपाध्यक्ष नितीन बंग, भालचंद्र राऊत, मनोज वालावलकर, सीमा शहा आदी मान्यवर उपस्थित होते. दत्तप्रसाद पेडणेकर हे विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करत असून विविध संस्थांमध्ये ते विविध पदावर ती काम करत आहेत. उद्योग, शिक्षण, कला, क्रीडा, समाजसेवा, आदी क्षेत्रामध्ये त्यांनी उल्लेखनीय कार्य केलेले आहे.
पत्रकार दत्तप्रसाद पेडणेकर यांच्या अभिनंदन निवडी बद्दल त्यांचे विविध क्षेत्रातील मान्यवर, मसुरे ग्रामस्थ, विविध पक्षांचे लोकप्रतिनिधी, उद्योजक दीपक सावंत, अखिल भारतीय कॅरम फेडरेशनचे उपाध्यक्ष बाळासाहेब गोसावी, उद्योजक निनाद धुरी, उद्योजक संतोष परब, समर्थ सहकारी पतपेढी मुंबई अध्यक्ष प्रकाश परब, समाजसेवक बाबा परब, माजी जी प अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर, माजी जी प अध्यक्ष सरोज परब, सरपंच संदीप हडकर, छोटू ठाकूर, महेश बागवे, विलास मेस्त्री, उद्योजक मिलिंद प्रभू, सुनील मयेकर, शामी सावंत यांनी अभिनंदन केले आहे.फोटो.इचलकरंजी येथे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड एग्रीकल्चर च्या सदस्यपदी दत्तप्रसाद पेडणेकर यांनी निवड झाल्याबद्दल अभिनंदन करताना अध्यक्ष ललित गांधी, उपाध्यक्ष डॉक्टर दीपक परब, आशिष पेडणेकर आणि मान्यवर..