Home स्टोरी महापालिकेच्या “९/आय” प्रभागातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासनाची धडक कारवाई!

महापालिकेच्या “९/आय” प्रभागातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासनाची धडक कारवाई!

105

कल्याण प्रतिनिधी:(आनंद गायकवाड): – कल्याण डोंबीवली महापालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांचे निर्देशानुसार व उपायुक्त सुधाकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली “९/आय” प्रभागाच्या सहा. आयुक्त हेमा मुंबरकर यांनी आडीवली ढोकली येथील बांधकामधारक संजय कांबळे यांच्या तळ + ४ मजली अनधिकृत इमारतीच्या स्लॅब बांधकामावर निष्कासनाची धडक कारवाई केली.सदर कारवाई अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे कर्मचारी व महापालिका पोलीस कर्मचारी यांच्या मदतीने आणि ३ काँक्रीट ब्रेकर, १० मजूर यांच्या सहाय्याने करण्यात आली.