Home स्टोरी महा आवास योजनेत राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा पुरस्कार देऊन सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा गौरव!

महा आवास योजनेत राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा पुरस्कार देऊन सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा गौरव!

163

मसुरे प्रतिनिधी:

महा आवास अभियानात सर्वोत्कृष्ट काम केल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला आहे. राज्य शासनाने मुंबईत आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर आणि जिल्हा ग्रामीण विकास सेंद्रिय तत्कालीन प्रकल्प संचालक राजेंद्र पराडकर यांनी हा सन्मान स्वीकारला.

यावेळी राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, प्रधान सचिव एकनाथ डवले,राज्य व्यवस्थापन कक्ष संचालक – ग्रामीण गृहनिर्माण डॉ.राजाराम दिघे, कोकण आयुक्त महिंद्र कल्याणकर आदींच्या उपस्थित हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.