Home स्टोरी मसुरेतील मूर्तिकार आशिष खोत, चिंकू खोत यांचा सन्मान…!

मसुरेतील मूर्तिकार आशिष खोत, चिंकू खोत यांचा सन्मान…!

154

कट्टा पंचक्रोशी भंडारी समाज संघ व आंबेरी भंडारी समाज संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन

 

मसुरे प्रतिनिधी: मालवण तालुक्यातील आंबेरी येथे कट्टा पंचक्रोशी भंडारी समाज संघ व आंबेरी भंडारी समाज संघ यांच्या संयुक्त विद्यमाने भंडारी समाजातील गणेश मूर्तिकार व आयुर्वेदिक वैद्य यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमावेळी भंडारी समाजातील सुमारे ५० मूर्तिकार व ६ आयुर्वेदिक वैद्य यांचा शाल श्रीफळ गुलाबपुष्प सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यामध्ये मसुरेतुन कावावाडी येथील आशिष खोत, व टोकळवाडी येथील चिंकू खोत या मुर्तीकाराना सन्मानित करण्यात आले.

 

यावेळी अध्यक्ष मामा माडये, आंबेरी सरपंच मनमोहन डीचोलकर, भंडारी समाज अध्यक्ष आंबेरी राजन सारंग, कुणकवळे माजी सरपंच आनंद वराडकर, माजी प. स. सदस्या श्रध्दा केळुसकर, तळगाव सरपंच लता खोत, वराडकर हायस्कूल कट्टा मुख्याध्यापक संजय नाईक, दिलीप वेंगुर्लेकर, प्रदीप आवलेगावकर, ऍड. प्रदीप मिठबावकर, सुरेश कांबळी, निलेश हडकर, गणेश वाईरकर, विद्याधर चिंदरकर, भाई आचरेकर, प्रवीण जावकर, सुशांत वाक्कर, किशोर वाक्कर, शरद केळुसकर, दिलीप खोत, बाबू कांबळी, पो. पा. दिलीप राऊत, सागर राऊत, अंकुश मांजरेकर, शशिकांत पाटकर व अन्य समाज बांधव मूर्तिकार, वैदय महिला वर्ग उपस्थित होते.

सदर कार्यक्रमावेळी उपस्थित असलेल्या कार्यकारिणी सदस्य, युवा पिढीचे समाज बांधव यांनी पुढाकार घेऊन समविचारी लोकांना एकत्र आणून असेच दर्जेदार कार्यक्रम यापुढे देखील केले जातील असे जाहीर केले.

यावेळी मामा माडये, संजय नाईक, मनमोहन डीचोलकर, राजन सारंग, मूर्तिकार संतोष नागवेकर, सुरेश कांबळी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऍड. प्रदीप मीठबावकर, सूत्रसंचालन गणेश डीचोलकर तर आभार श्रध्दा केळुसकर यांनी मानले.